Rohit Sharma: 2 जूनपासून आयसीसी टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडियाचे काही खेळाडू अमेरिकेला रवाना झाले होते. 5 जून रोजी या टूर्नामेंटमधील टीम इंडिया पहिला सामना खेळणार असून त्यापूर्वी टीम इंडियाला एक सराव सामना देखील खेळायचा आहे. अशातच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि मुख्य कोच राहुल द्रविड अमेरिकेला पोहोचले आहेत. तर रोहित शर्मा आणि ऋषभ पंतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पंतने रोहितला केक भरवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी रोहित शर्माने तो खाण्यास नकार दिला. अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंचा एक छोटा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये ऋषभ पंतने खेळाडूंना केक खाऊ घातला, मात्र रोहित शर्माने केक खाण्यास नकार देत 'जिंकल्यानंतर खाऊ', असं सांगितले.
रोहित शर्माने नकार दिल्याने ऋषभ पंतचा चेहरा काही काळ पडला. मात्र, रोहित शर्मा हे त्याच्या
मस्करीच्या अंदाजात बोलत असल्याचं पंतलाही माहीत होतं. टीम इंडियाने शेवटचा T-20 वर्ल्डकप 2007 मध्ये जिंकला होता.
वनडे वर्ल्डकप 2023 पूर्वी एका सिरीजनंतर झालेल्या प्रेस कॉन्फ्रंसमध्ये अचानक फटाके फोडल्याने रोहित वक्तव्यात व्यत्यय आला. हे ऐकून विचलित न होता रोहित शर्मा म्हणाला, "अरे, वर्ल्डकप जिंकल्यानंतर हे सर्व फटाके फोडा..." त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित पत्रकार आणि लोक हसले होते. या क्षणाची आठवण पुन्हा एकदा चाहत्यांना झाली आहे.
भारतीय टीमची दुसरी तुकडी टी-20 वर्ल्डकपसाठी लवकरच रवाना होणार आहे. या बॅचमध्ये विराट कोहलीही जाणार आहे. विराट कोहली आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या आरसीबी टीमचा एक भाग होता. तो अजून टी-20 वर्ल्डकपसाठी रवाना झालेला नाही. 2 जून ते 29 जून या कालावधीत अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने टी-20 वर्ल्डकप स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये भारताचा सामना 9 जून रोजी पाकिस्तानशी होणार असून त्याकडे सर्वांचं लक्ष आहे.
2024-05-28T04:01:30Z