T20 WORLD CUP 2024: वर्ल्डकपसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा? अशी असू शकते टीम इंडिया...

India T20 World Cup 2024 Probable Squad: येत्या जून महिन्यापासून आयसीसीच्या टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्डकपसाठी नुकतंच न्यूझीलंडच्या टीमने स्व्कॉडची घोषणा केली. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया हा वर्ल्डकप खेळणार आहे. अशातच आज म्हणजेच मंगळवारी वर्ल्डकपसाठीच्या टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच 2024 च्या T20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीमची घोषणा करणार आहे. टीम इंडिया हा वर्ल्डकप रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळू शकते. त्यामुळे बीसीसीआय अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देऊ शकते. टीम इंडिया बहुतेक सामने अमेरिकेत खेळणार आहे. यावेळी टीम इंडिया विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांना संधी देऊ शकते.

टी-20 टीमसाठी कोणाला मिळणार टीममध्ये संधी?

सध्या आयपीएल सुरु असून विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन चांगल्या फॉर्मात आहे. आयपीएलमध्येही तो चांगली कामगिरी करताना दिसतोय. सॅमसनने नुकतेच लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध नाबाद 71 रन्स केले होते. याशिवाय त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध नाबाद 68 रन्स केलेले. सॅमसनसोबतच ऋषभ पंत जागेसाठी प्रबळ दावेदार मानला जातोय. पंतने आयपीएलच्या या सिझनमधील 10 सामन्यांमध्ये 371 रन्स केल्या आहेत. या काळात त्याने एका सामन्यात नाबाद 88 रन्स केले. याशिवाय पंतने 3 अर्धशतकं झळकावली आहेत. एकंदरीत पंत आणि सॅमलन या दोघांनीही चांगली केली आहे. 

गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये कोणाला मिळणार संधी?

यंदाच्या वर्ल्डकप टीममध्ये कोणत्या गोलंदाजांना संधी मिळते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. घातक गोलंदाज अर्शदीप सिंग चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे टीम इंडियामध्ये त्याला संधी दिली जाऊ शकते. आवेश खान किंवा मोहम्मद सिराज यांनाही स्थान मिळू शकते. फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल फॉर्मात आहे. मात्र तो बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र, त्याचा फॉर्म पाहता त्याला संधी मिळू शकते. 

कशी असेल वर्ल्डकपसाठी संभाव्य टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शिवम दुबे, रिंकू सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज/आवेश खान

अन्य दावेदार- केएल राहुल, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, संदीप शर्मा.

2024-04-30T03:34:37Z dg43tfdfdgfd