T20 WORLD CUP 2024 साठी भारताचा संघ ठरला? फोटोशूट करायला खेळाडू कुठे पोहोचले पाहा...

नवी दिल्ली : भारतीय संघापुढे आता सर्वात मोठे आव्हान असेल ते T20 World Cup 2024 या आयसीसीच्या नामांकित स्पर्धेचे. कारण बराताला वनडे वर्ल्ड कप जिंकता आला नव्हता. त्यामुळे आता भारतीय संघासाठी ही स्पर्धा महत्वाची असेल. पण या स्पर्धेसाठी आता भारताचा संघ जाहीर झाला आहे, असे समोर येत आहे. कारण भारताच्या टी-२० संघातील खेळाडू आता टी-२० वर्ल्ड कपच्या फोटोशूटसाठी खास ठिकाणी पोहोचलेले आहेत.

काही दिवसांत आयपीएल सुरु होणार आहे. त्यानंतर लगेच टी-२० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला लवकरच आपला टी-२० संघ जाहीर करावा लागेल, असे म्हटले जात होते. कारण आयपीएलनंतर लगेच टी-२० वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. त्यामुळे खेळाडूंना जास्त वेळ मिळणार नाही. त्यामुळे ज्या खेळाडूंचा संघ आयपीएलमधून लवकर बाहेर पडेल त्यांनी वर्ल्ड कपसाठी लवकर निघायचे, असा फतवा बीसीसीआयने काढला आहे. त्यामुळे आयपीएलनंतर खेळाडूंना फोटोशूटसाठीही वेळ नसेल त्यामुळे आता खेळाडू जास्त व्यग्र नसताना त्यांचे फोटशूट बीसीसीआय करत असल्याचे समोर आले आहे.

भारताचा पाचवा कसोटी सामना हा धरमशाला येथे होणार आहे. यानंतर भारताचे सर्व खेळाडू हे आयपीएलसाठी आपल्या विविध संघांकडे रवाना होतील. कारण आयपीएलसाठी आता फार कमी वेळ राहीला आहे आणि खेळाडूंना आयपीएलचा सरावही करायचा आहे. त्यासाठी बीसीसीआयने एक शक्कल लढवली आहे. भारताचे जास्तीत जास्त खेळाडू धरमशाला येथे आहेत. त्यामुळे बीसीसीआयने टी-२० वर्ल्ड कपसाठीचे फोटोशूट धरमशाला येथे आयोजित करण्यात आल्याचे समोर येत आहे. कारण रिंकू सिंग हा भारताच्या कसोटी संघात नाही, तरीही तो धरमशाला येथे पोहोचला आहे. त्यामुळे आता भारताच्या टी-२० संघाचे फोटोशूट हे धरमशाला येथे सुरु झाल्याचे म्हटले जात आहे आणि त्याला सबळ असे कारणही समोर आले आहे. कारण रिंकूला धरमशाला येथे पोहोचण्याचे काही कारणच नव्हते. त्यामुळे बीसीसीआयने टी-२० वर्ल्ड कपसाठी आपला संघ निवडला असल्याचे आता समोर येत आहे. कारण त्याशिवाय हे फोटोशूट होऊ शकत नाही.

भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कपची तयारी करण्यासाठी फार कमी वेळ मिळणर आहे. त्यासाठी आता बीसीसीआय नेमकं काय करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण खेळाडूंना जर सराव करायला वेळ मिळाला नाही तर त्यांची कामगिरी चांगली होणार नाही, हे बीसीसीआयला देखील चांगले माहिती आहे.

2024-03-05T12:51:04Z dg43tfdfdgfd