T20 WORLD CUP: वर्ल्डकपसाठी 11 देशांच्या संघांची घोषणा बाकी; पाहा ICC चा नियम काय सांगतो?

T20 World Cup: जून महिन्यात T20 वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. 2 जूनपासून वर्ल्डकपला सुरुवात होणार असून टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. दरम्यान यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून भारतासोबत एकूण 9 देशांनी त्यांच्या टीमची घोषणा केली आहे. ICC ला वर्ल्डकप स्पर्धेसाठी तुमच्या टीमबद्दल माहिती देण्याची शेवटची तारीख 1 मे होती. 

जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी यंदाच्या वर्षी एकूण 20 देशांचा सहभागी होत आहेत. अशा परिस्थितीत 11 देशांची वर्ल्डकप टीम अद्याप जाहीर झालेलं नाहीत. अशा परिस्थितीत 1 मे पर्यंत जर वर्ल्डकप टीमची घोषणा करायची होती. मात्र अजूनही 11 देशांनी आपला संघ का जाहीर केला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान याबाबत ICC चा नियम काय सांगतो हे जाणून घेऊया. 

या देशांच्या टीमची घोषणा झाली

1 जूनपासून खेळल्या जाणाऱ्या वर्ल्डकपसाठी न्यूझीलंडने सर्वप्रथम त्यांच्या टीमची घोषणा केली होती. 29 एप्रिल रोजी किवींनी त्यांच्या टीमची घोशणा केली होती. दुसऱ्या दिवशी, भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, अफगाणिस्तान यांनी त्यांच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. 1 मे रोजी, म्हणजे आयसीसीकडे त्यांची टीम सादर करण्याचा शेवटचा दिवस, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, ओमान आणि कॅनडा यांनी त्यांची टीम जाहीर केली.

या देशांकडून अजून संघ जाहीर नाही

दरम्यान यामध्ये एकूण 11 देशांचा समावेश आहे, ज्यांनी वर्ल्डकपसाठी अजून टीमची घोषणा केलेली नाही. यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड्स, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, श्रीलंका, युगांडा, यूएई आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे. वेस्ट इंडिजचा संघ 3 मे रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता जाहीर केला जाणार आहे. मात्र तरीही अजून 10 देश बाकी आहेत. 

आयसीसीचा नियम काय सांगतो?

या देशांना 1 मे पर्यंत त्यांच्या संघांची घोषणा करायची होती. याशिवाय 25 मे पर्यंत सर्व देश त्यांच्या घोषित केलेल्या टीम्समध्ये बदल करू शकतात. यानंतर कोणताही बदल आयसीसीच्या समितीच्या मान्यतेनंतर करता येणार आहे. वर्ल्डकप खेळणाऱ्या टीममधील काही खेळाडू जखमी आहे. त्यामुळे आयसीसीकडून त्याच्यावर संघ जाहीर करण्याचा कोणताही दबाव नाही. नियमांनुसार देशांना टीम फक्त आयसीसीला द्यावी लागणार आहे. अशा स्थितीत शक्य असेल तेव्हा देश आपला संघ जाहीर करू शकतो.

2024-05-03T05:16:45Z dg43tfdfdgfd