WPL POINTS TABLE मुंबई इंडियन्सचे सर्वाधिक गुण असूनही दुसऱ्या स्थानावर का, जाणून घ्या...

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा संघ सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या संघाने महिलांच्या प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक गुण पटकावले आहेत. पण तरीही मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानावर नाही. हे असं का घडलं आहे, ते आता समोर आले आहे.

मुंबई इंडियन्सचा पहिला विजय...

WPL मध्ये मुंबईने दोन सामने खेळले आहेत. मुंबईचा पहिला सामना चांगलाच थरारक झाला होता. मुंबईच्या संघाला विजयासाठी एका चेंडूत पाच धावांची गरज होती. तेव्हा मुंबई इंडियन्सची सजना सजीवन ही फलंदाजीला आली होती. तिचा हा पहिलाच चेंडू होता. या पहिल्याच चेंडूवर तिने षटकार लगावला आणि मुंबईला दमदार विजय मिळवून दिला. थरारक झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली होती. त्यावेळी मुंबईच्या संघाला दोन गुण मिळाले होते. त्यानंतर मुंबईचा दुसरा सामना हा गुजरात टायटन्सबरोबर झाला होता.

Mumbai Indians पेक्षा कोणाचेही गुण जास्त नाहीत

मुंबईने गुजरातबरोबरच्या या सामन्यात सहजपणे विजय मिळवला. मुंबईने गुजरातवर पाच विकेट्स आणि ११ चेंडू राखून मात केली. हा मुंबईचा दुसरा विजय होता. त्यामुळे मुंबईच्या खात्यात ४ गुण जमा झाले. सध्याच्या घडीला गुणतालिकेत कोणत्याही संघाचे चारपेक्षा जास्त गुण झालेले नाहीत, पण तरीही मुंबईचा संघ हा अव्वल स्थानावर पोहोचू शकलेला नाही.

सर्वाधिक गुण असूनही मुंबईचा संघ अव्वल स्थानावर का नाही...

या लीगमध्ये पाच संघ आहेत. मुंबईने दोनपैकी दोन सामने जिंकले आहेत. आरसीबीच्या संघाने मंगळवारी दुसरा विजय साकारला. त्यामुळे मुंबई आणि आरसीबी यांचे सर्वाधिक समान असे चार गुण झाले आहेत. मुंबई इंडियन्सचा रन रेट हा ०.४८८ आहे, तर आरसीबीचा रन रेट हा १.६६५ असा आहे. त्यामुळे मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघांचे समान गुण असले तरी रन रेटच्या जोरावर आरसीबीचा संघ पहिल्या आणि मुंबईचा संघ हा दुसऱ्या स्थानावर आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाने तिसरा सामना जिंकला तर त्यांना अव्वल स्थानावर येण्याची नामी संधी असेल.

2024-02-28T12:04:55Z dg43tfdfdgfd