WPL जिंकल्यानंतर स्मृती मानधनाची विराट कोहलीसोबत तुलना, मानधनाने नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

आरसीबीसाठी महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावणाऱ्या स्मृती मानधना हिने विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केले आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबी महिला संघाच्या विजेतेपदानंतर विराट कोहली आणि स्मृती मानधना यांच्यात तुलना करण्यात आली. सोशल मीडियावर याबाबतचे अनेक मीम शेअर करण्यात आले. एव्हढेच नाही कर आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सनेही याबाबत एक मीम शेअर केले होते. मात्र आता स्मृती मानधनाने यावर प्रतिक्रिया देत तुलना करणाऱ्यांचे तोंड बंद केलं आहे.

मंधानाच्या नेतृत्वाखाली आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. तसेच WPLच्या दुसऱ्या सत्रात चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. तर गेल्या १६ वर्षात त्यांचा पुरुष संघ आयपीएल विजेतेपद जिंकण्यात अपयशी ठरला. या काळात कोहली जवळपास एक दशक संघाचा कर्णधार राहिला आहे. यावरुन किंग कोहलीला ट्रोल करण्यात आले होते. तसेच अनेक प्रतिक्रिया उमटत होत्या. यावर आता स्मृती मानधनाने कोहलीसोबत माझी तुलना करणे मला योग्य वाटत नसल्याचं वक्तव्य केलं आहे.

स्मृती मानधना नेमकं काय म्हणाली?स्मृती मानधना म्हणाली की, टायटल्स ही एक गोष्ट आहे. पण कोहलीने देशासाठी जे काही मिळवले ते उल्लेखनीय आहे. त्यामुळे मी माझ्या कारकिर्दीत ज्या टप्प्यावर आहे, कोहलीने जे काही साध्य केले आहे, ते पाहता मला तुलना करणे योग्य वाटत नाही. मला तुलना योग्य वाटत नाही कारण त्याने जे काही मिळवले ते अतुलनीय आहे. विराट कोहली एक प्रेरणादायी व्यक्ती आहे. एक ट्रॉफी अनेक गोष्टी ठरवत नाही. आम्ही सर्व त्याचा आदर करतो, असं मानधना म्हणाली आहे.

स्मृती मानधना आणि विराट कोहली दोघेही १८ क्रमांकाची जर्सी घालतात. या आधारावर दोघांची तुलना करणे योग्य नाही, असे एका फलंदाजाने म्हटले आहे. मानधना म्हणाली की, "मी जर्सी नंबर १८ ची तुलना म्हणणार नाही. जर्सी नंबर ही फक्त वैयक्तिक निवड आहे. माझा वाढदिवस १८ आहे आणि माझा जर्सी नंबर १८ आहे. तो कसा खेळतो आणि मी कसा खेळते हे ते दर्शवत नाही.

2024-03-19T16:13:29Z dg43tfdfdgfd