YUVRAJ SINGH: अखेर 6 षटकार मारण्याचं गुपित युवीने उलगडलं, 'त्या' सामन्यात नेमकं काय घडलं?

Yuvraj Singh: टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंह सिक्सर किंग म्हणून ओळखला जातोय. युवराज त्या खेळाडूंपैकी एक आहे, ज्याने 2002 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, 2007 मध्ये टी-20 वर्ल्डकप आणि 2011 चा वनडे वर्ल्डकपची ट्रॉफी उचलली होती. युवराजची सर्वात आठवणीतील खेळी म्हणजे 6 बॉल्समध्ये 6 सिक्स मारले. जेव्हा त्याने हा पराक्रम केला तेव्हा युवराजला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नुकताच झालेल्या मुलाखतीत त्याने हा खुलासा केला आहे. 

Yuvraj Singh ला गळा कापण्याची दिली होती धमकी

2007 साली झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये त्याने उत्तम खेळी केली होती. T20 वर्ल्डकपमध्ये 2007 मधील युवराज सिंगचे 6 सिक्स कोणीही विसरू शकणार नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट बोर्डाच्या ओव्हरमध्ये त्याने ही कामगिरी केली. याशिवाय त्याने इंग्लंडचा खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफच्या गोलंदाजीवर बॅक टू बॅक फोर लगावले होते. त्यानंतर लाईव्ह सामन्यादरम्यान त्याने युवराज सिंगसोबत भांडणं सुरू केलं होतं. आता युवराजने या प्रकरणावर एक मोठा खुलासा केला आहे. 

यासंदर्भात एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना युवराज म्हणाला की, त्यावेळी मी अँड्र्यू फ्लिंटॉफला दोन फोर लगावले होते. त्याला माझी खेळी आवडली नव्हती. ओव्हर पूर्ण झाल्यानंतर फ्लिंटॉफने माझ्या खेळीला खराब असं संबोधलं. याशिवाय माझा गळा कापणार असल्याचंही तो म्हणाला होता. या वादापूर्वी 6 सिक्स मारण्याचा माझा कोणताही विचार नव्हता.

युवराजने फ्लिंटॉफला दिलं सडेतोड उत्तर

यावेळी फ्लिंटॉफला उत्तर देताना युवराज म्हणाला की, त्यानंतर मी त्याला म्हणालो की, माझ्या हातात जी बॅट आहे, त्याने मी तुला कुठे मारू शकतो याची तुला कल्पना असते. यानंतर अंपायर आमच्या मध्ये आहे आणि त्यांनी मध्यस्ती केली. मग मी प्रत्येक बॉल फक्त बाऊंड्रीबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला. माझे नशीब चांगलं होतं की, मी त्या दिवशी असं करण्यात यशस्वी झालो.”

यानंतर युवराजने त्याच सामन्यात 19व्या ओव्हरमध्ये आलेल्या स्टुअर्ट ब्रॉडला टारगेट केलं. त्याने ब्रॉडला एकामागून एक 6 सिक्स मारले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग सहा सिक्स लगावणारा युवराज पहिला फलंदाज ठरला. या सिक्ससह युवराजने 12 बॉल्समध्ये अर्धशतक झळकावण्याचा पराक्रमही केला होता. त्या सामन्यात इंग्लंडचा 18 धावांनी पराभव झाला.

2024-03-08T12:27:25Z dg43tfdfdgfd