अन् यांना वर्ल्ड कप जिंकायचाय..! बाबर आझमचं हास्यास्पद विधान, ऐका.. म्हणतो तर काय...!

PAK vs NZ T20 Series : टी20 वर्ल्ड कप सुरू व्हायला आता थोडाच वेळ शिल्लक राहिला आहे. वर्ल्ड कप आधी बहूतेक इंटरनॅशनल क्रिकेटर्स हे आयपीएल खेळण्यात व्यस्त आहे, तर एकाबाजूला पाकिस्तान क्रिकेट संघ हा न्यूझीलंडच्या 'B' संघाविरूद्ध आपल्या मायदेशी 5 सामन्यांची टी20 सिरीज खेळत आहे. या सिरीजमधील सुरूवातीच्या सामन्यात पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमने आपला तडाखा दाखवत न्यूझीलंडच्या संघाला पराभूत केले होते, पण दुर्देवाने नंतरच्या सामन्यामध्ये पाकिस्तानचे प्रदर्शन खालावले आणि न्यूझीलंडच्या संघाने पलटवार करत पाकिस्तानला चांगलेच धूतले होते. पण पाकिस्तान क्रिकेट संघाचा कॅप्टन बाबर आजम याने या सिरीजमधील तिसरा सामना हरल्यानंतर एक फाल्तू  विधान केलं आहे, जे ऐकून कोणीही आपले हसू थांबवु शकणार नाही.

पाकिस्तानच्या पराभवानंतर कॅप्टन बाबरचे फाल्तू विधान

पाच सामन्यांचा टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात किवी संघाने पाकिस्तानला एकतर्फी सामन्यात पराभूत केलं आहे. सामना संपल्यावर बाबर आपल्या पराभवाबद्दल विचारले गेले असताना बोलला की, 'आम्ही अजून 10 धावा करण्यात कमी पडलो.' पण जर स्कोरबोर्डवर नजर टाकली तर न्यूझीलंडच्या संघाने 10 बॉलआधीच 180 धावांचे मोठे लक्ष पार केले होते आणि न्यूझीलंडच्या हातात तेव्हा 7 विकेट हातात होत्या आणि किवी संघाचा सेट बॅट्समन मार्क चॅपमन हा मैदानात नाबाद होता, यामुळे बाबरने केलेलं वक्तव्य हे एकदम निरर्थक ठरलं आहे. 

तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव

पाकिस्तानविरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 सिरीजमध्ये न्यूझीलंडचा एकही दिग्गज खेळाडूने आयपीएल सुरू असल्यामुळे या सिरीजमध्ये उपस्थिती दर्शवली नाही. या खेळाडूंच्या लिस्टमध्ये केन विलियम्सन, लॉकी फर्ग्यूसन, डॅरेल मिचेलस रचीन रविंद्र या स्टार खेळाडूंपैकी एकही खेळाडू पाकिस्तानविरूद्ध सुरू असलेल्या सिरीजमध्ये खेळत नाहीये. तरीही न्यूझीलंडच्या B संघाने पाकिस्तानच्या A टीमला चांगल्या पद्धतीने धूतलं आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात किवी संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, यानंतर किवी संघाच्या दमदार गोलंदाजीमुळे त्यांनी पाकिस्तानी फलंदाजांना 178 धावांवर थांबवलं आणि दुसऱ्या इनिंगमध्ये  मार्क चॅपमनच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे न्यूझीलंड संघाने हा सामना फक्त 7 विकेट्सने, 18.2 बॉलमध्येच जिंकला होता.

चॅपमनच्या फलंदाजीमुळे किवी संघाचा सहज विजय

सिरीजच्या पहिला सामना हा पावसामुळे रद्द झाला होता, यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाने बाजी मारली होती, मात्र तिसऱ्या सामन्यात किवी खेळाडूंनी दमदार कमबॅक करत पाकिस्तान संघाचा हाल बेहाल केला आहे. न्यूझीलंडच्या संघाकडून मार्क चॅपमन याने 42 बॉलमध्ये 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 87 धावांची मॅच विनिंग इनिंग खेळली आहे आणि या 5 सामन्यांच्या सिरीजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. तर आता सीरीजमधील पूढील सामन्यात कोण बाजी मारणार आणि कोणता संघ या सिरीजवर आपले वर्चस्व निर्माण करणार ही गोष्ट बघण्यायोग्य ठरणार आहे.

2024-04-24T10:42:03Z dg43tfdfdgfd