अर्जुन तेंडुलकर मलिंगाशी स्पर्धा करायला गेला, जिकलं कोण व्हिडिओमध्ये पाहा...

मुंबई : लसिथ मलिंगाने एक काळ चांगलाच गाजवला आहे आणि सध्याच्या घडीला तो मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. त्याचबरोबर अर्जुन तेंडुलकर गेल्या २-३ वर्षांपासून आपल्याला क्रिकेट खेळताना दिसत आहे. पण अर्जुन तेंडुलकर थेट मलिंगाशी स्पर्धा करायला गेला. पण या स्पर्धेत नेमकं जिंकलं तरी कोण, हे आता व्हिडिओमध्ये स्पष्ट झाले आहे.

नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...

मलिंगा हा मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक असल्याने तो खेळाडूंना गोलंदाजी शिकवत होते. त्यावेळी मलिंगा यांनी एक स्पर्धा खेळण्याचे ठरवले. त्यावेळी सर्वांना बॉल आऊट करण्याची स्पर्धा घेण्याचे ठरवले. त्यानंतर बॉल आऊटसाठी एकच स्टम्प लावण्यात आला आणि सर्वांना गोलंदाजी करण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी यावेळी बॉल आऊट करायला सुरुवात केली. यामध्ये अर्जुन तेंडुलकरही होता.

अर्जुन तेंडुलकरने यावेळी चेंडू टाकला पण तो स्टम्पला लागला नाही. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या अन्य गोलंदाजांनीही चेंडू टाकले खरे, पण एकाहाची चेंडू यावेळी स्टम्पला लागला नाही. अर्जुन तेंडुलकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी यावेळी गोलंदाजी करत चेंडू टाकले खरे, पण एकाचाही चेंडू यावेळी स्टम्पला लागला नाही. या सर्व खेळाडूंवर ही वाईट वेळ आली होती. त्यानंतर मलिंगा चेंडू टाकण्यासाठी आला. त्यावेळी मलिंगा आता काय करणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली होती.

View this post on Instagram

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

]]>

मलिंगा यावेळी चेंडू टाकायला आला. मलिंगाने काही जास्त रन अप घेतला नाही. थोडाला रन अप घेत आणि मलिंगाने चेंडू टाकला. मलिंगाने यावेळी असा चेंडू टाकला की तो थेट स्टम्पला जाऊन लागला. त्यानंतर मलिंगाने दोन्ही हात उंचावले आणि ही एवढी सोपी गोष्ट आहे, हे सर्वांना सांगितले. पण मलिंगाने जेवढ्या सोप्या पद्धतीने ही गोष्ट साकारली, ती बाकी कोणालाही जमली नाही. त्यामुळेच मलिंगासारखा या जगात दुसरा गोलंदाज होऊच शकत नाही, हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले.

मलिंगाने यावेळी संघातील सर्व गोलंदाजांना, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी बाप हा बापच असतो, हे या एका गोष्टीमधून दाखवून दिले आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-11T10:16:15Z dg43tfdfdgfd