अशी कामगिरी करणारा अँडरसन ठरला पहिला वेगवान गोलंदाज, यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये हे कोणालाही जमले नाही..

भारत विरुद्ध इंग्लंड ५ व्या कसोटी सामन्यात गोलंदाज जेम्स अँडरसनने ७०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. हा सामना सुरू होण्यापूर्वी जेम्सने ६९८ खेळाडूंना आऊट केले होते. भारतीय संघातील दोन खेळाडूंना बाद करुन त्याने ही कामगिरी करून दाखवली आहे. अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये ७०० बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे, तर एकूणच तो तिसरा गोलंदाज आहे. त्याच्या आधी केवळ श्रीलंकेचे मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांनाच कसोटीत ७०० हून अधिक बळी घेता आले आहेत.

हा फलंदाज ठरला ७००वी विकेट सामना सुरू होण्यापूर्वी जेम्सने ६९८ खेळाडूंना आऊट केले होते. भारतीय संघातील दोन खेळाडूंना बाद करुन त्याने ही कामगिरी करून दाखवली आहे. शतकवीर शुभमन गिल याची विकेट अँडरसनला मिळाली. त्यांनतर डावाच्या शेवटी कुलदीप यादवची विकेट त्याने मिळवली व ही त्याची ७००वी विकेट ठरली आहे.

जेम्स अँडरसन हा पहिला वेगवान गोलंदाज ४१ वर्षीय जेम्स अँडरसनने आपल्या १८७व्या कसोटीत ही कामगिरी केली आहे. श्रीलंकेचा मिस्ट्री स्पिनर मुरलीधरन ११३ टेस्ट खेळला होता, तर ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू शेन वॉर्न १४४ टेस्ट नंतर हा विकेट्सचा टप्पा गाठू शकले. तसे पाहिले तर अँडरसनने इथंपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितच अधिक मेहनत केली आहे, ही कोणत्याही वेगवान गोलंदाजासाठी अभिमानाची बाब आहे. जर आपण बारकाईने पाहिले तर क्रिकेट इतिहासात एकही वेगवान गोलंदाज ७०० बळींचा टप्पा गाठताना दिसला नाही. तसेच, अँडरसन लवकरच शेन वॉर्नची बरोबरी करणार आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स८००: मुथय्या मुरलीधरन

७०८: शेन वॉर्न

७००: जेम्स अँडरसन

६१९: अनिल कुंबळे

६०४: स्टुअर्ट ब्रॉड

जेम्स अँडरसन याने केलेल्या कामगिरीचे क्रिकेट विश्वात मोठे कौतूक होत आहे. वेगवान गोलंदाजीच्या इतिहासात त्याची ही कामगिरी मानक ठरली आहे.

2024-03-09T06:31:13Z dg43tfdfdgfd