आयपीएल 2009 ची पुनरावृत्ती होणार? सनरायजर्स हैदराबादचा संघ पाहून इतर संघांना धडकी भरेल..

IPL 2024, SRH Playing XI: आयपीएलच्या सतराव्या हंगामाची येत्या 22 मार्चपासून सुरुवात होतेय. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स रॉयल (CSK) चॅलेंजर्स बंगलोरमध्ये (RCB) रंगणार आहे. त्यानंतर पुढच्याच दिवशी म्हणजे 23 मार्चला सनराजयर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आपला पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळेल. यंदाच्या हंगामात सनरायजर्सचा संघ नव्या कर्णधारासह नव्या उमेदीने उतरणार आहे. 

सनरायजर्सचा तुल्यबळ संघ

गेल्या काही हंगामाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात सनरायजर्सचा (SRH) संघ अधिक तुल्यबळ आहे. आयपीएल 2024 च्या ऑक्शनमध्ये सनरायजर्स हैदराबादने अनेक नव्या खेळाडूंवर बोली लावली. यात सर्वात मोठी बोली ठरली ती ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सवरची. पॅट कमिन्सवर (Pat Cummins) हैदराबादने तब्बल 20 कोटी 50 लाखांची बोली लावत आपल्या संघात घेतलं. त्याचबरोबर ट्रेव्हिस हेडचा संघात समावेश करण्यात आलाय. त्यामुळे हैदराबादचा संघ जेतेपदाच्या इराद्याने मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालाय.

अशी असेल प्लेईंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग इलेव्हनही जवळपास निश्चित झालीय. मयंक अग्रवाल आणि ट्रेव्हिस हेड डावाची सुरवात करतील. तर तिसऱ्या क्रमांकावर राहुल त्रिपाठी आणि चौथ्या क्रमांकावर अॅडम मार्करम फलंदाजीला उतरु शकतील. विशेष म्हणजे चारही फलंदाज टी20 स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातात. एकटयाच्या जीवावर सामन्याचा निकाल पालटण्याची ताकद या चार फलंदाजांमध्ये आहे. 

त्यानंतर विकेटकिपर हेन्रिक क्लासेन आणि अब्दुल समद मॅच फिनिशरची भूमिका बजावू शकतात. दोघंही आपल्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखले जातात. सातव्या आणि आठव्या क्रमांकावर शाहबाद अहमद आणि वॉशिंग्टन सुंदर ही ऑलराऊंडर जोडी मैदानात उतरेल. फिरकी गोलंदाजीबरोबरच दोघंही फटकेबाजीसाठी ओळखले जातात. वेगवान गोलंदाजीची जबाबादारी कर्णधार पॅट कमिन्सबरोबरच वेगाचा बादशाह उमरान मलिक (Umran Malik) आणि स्विंग मास्टर भुवनेश्वर कुमारवर (Bhuvneshwar Kumar) असेल. 

सनराइजर्स हैदराबादची संभाव्या प्लेईंग इलेव्हन : ट्रेविस हेड, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, वाशिंगटन सुंदर, पॅट कमिंस (कर्णधार), उमरान मलिक आणि भुवनेश्वर कुमार

सनरायजर्स हैदराबादचे सामने

सनरायजर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स - 23 मार्च

सनरायजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स - 27 मार्च

सनरायजर्स हैदराबाद वि. गुजरात टायटन्स - 31 मार्च

सनरायजर्स हैदराबाद वि.  चेन्नई सुपर किंग्स - 5 एप्रिल

2024-03-19T10:06:06Z dg43tfdfdgfd