आयपीएल सुरु असताना भारतीय क्रिकेटपटूवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप, पाहा संपूर्ण प्रकरण...

नवी दिल्ली : भारतीय वंशाचा क्रिकेटपटू निखिल चौधरी अडचणीत सापडला आहे. कारण त्याच्यावर आता बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. निखिल हा डान्स क्लबमध्ये गेला होता. तिथे त्याने पीडीत महिलेबरोबर डान्स केला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना किसही केले आणि त्यानंतर निखिलने पीडीत महिलेवर कारमध्ये बलात्कार केल्याचे आता समोर येत आहे.

निखिल हा बिग बॅश लीगमध्ये तस्मानियाकडून खेळतो आणि त्याच्यावर आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या मित्रांनी टाऊन्सविले येथील जिल्हा न्यायालयात सांगितले की, आम्ही तिला रडताना पाहिले आणि तिच्यावर बलात्कार झाल्याचे तीने आम्हाला सांगितले. 27 वर्षीय निखिल हा बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्स या संघाकडून खेळतो. या प्रकरणी आपण दोषी नसल्याची कबुली निखिलने दिली आहे आणि त्यानंतर हा खटला सुरू आहे.

फिर्यादींनी आरोप केला आहे की, येथील फ्लिंडर्स स्ट्रीटवर निखिल चौधरीच्या कारमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्याचबरोबर तिला जखम झाली आणि रक्तस्त्राव झाला. टाऊन्सविले जिल्हा न्यायालयाच्या अहवालानुसार, निखिल चौधरी हा २० वर्षीय पीडित महिलेला बँक नाईट क्लबच्या डान्स फ्लोअरवर भेटले, जिथे त्यांनी नाचले आणि चुंबन घेतले. त्यानंतर हा वाईट प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे.

पीडित महिलेच्या मित्रांनी मंगळवारी न्यायालयात सांगितले की, तक्रारदार आणि चौधरी यांना पहाटे तीनच्या सुमारास त्यांच्या कारमधून जाताना पाहून त्यांना काळजी वाटू लागली. पीडितेच्या कारच्या खिडकीला धक्का देऊन निखिलला कारमधून बाहेर पडताना पाहिले. पीडित मुलगी रडत होती आणि तिने तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले.

आई म्हणाली- तिने मला रडत फोन केला आणि म्हणाली...पीडित महिलेच्या आईने सांगितले की, "सकाळी माझ्या मुलीने मला रडत फोन केला आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले, ती पोलिसांसोबत होती आणि तिला रुग्णालयात जावे लागणार होते. तिने मला सांगितले की, तिला एका मुलाला भेटला आणि नंतर कारमध्ये बसले आणि तो तिच्या मागे गेला. त्यानंतर हा वाईट प्रकार घडल्याचे मला तिने सांगितले."

फॉरेन्सिक नर्स निकोल एटकेन यांनी सांगितले की, " कथित बलात्काराच्या काही तासांत तिने तक्रारदाराची तपासणी केली. यावेळी पीडितेला अंतर्गत जखमा झाल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणात दोघांचेही बोलणे ऐकून घेतले जाईल आणि त्यानंतर नेमका काय निर्णय घ्यायचा, ते ठरवले जाई."

2024-03-27T08:31:22Z dg43tfdfdgfd