ईशान आणि हार्दिक यांना BCCI चा वेगळा न्याय का, इरफान पठाणने नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या...

नवी दिल्ली : बीसीसीआयने बुधवारी आपले खेळाडूंबरोबरचे करार जाहीर केले. यावेळी बीसीसीआयने ईशान किशनला वगळले तर हार्दिक पंड्याला करारामध्ये स्थान दिले आहे. पण त्यानंतर आता भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणचे एक ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. यामध्ये इरफानने ईशान आणि हार्दिक यांना वेगळा न्याय का, असा प्रश्न बीसीसीआयला विचारला आहे.

बीसीसीआयच्या करारात नेमकं काय घडलं...

बीसीसीआयने जो करार जाहीर केला आहे. त्यामध्ये ईशान किशनला वगळण्यात आले आहे. पण दुसरीकडे हार्दिक पंड्याला मात्र त्यांनी करारात स्थान दिले आहे. ईशान आणि हार्दिक हे दोघेही एकत्र सराव करत आहेत. त्याचबरोबर हे दोघेही एकत्रपणे टी-२० स्पर्धा सध्याच्या घडीला खेळतही आहेत. पण तरीही बीसीसीआयने आपल्या करारात ईशानला वगळले आहे आणि हार्दिकला स्थान दिले आहे.

इरफान पठाण नेमकं काय म्हणाला आहे, जाणून घ्या...

या कराराबाबत इरफान पठाण म्हणाला की, " ईशान किशन आणि श्रेयस अय्यर हे दोघेही प्रतिभावान खेळाडू आहेत. मला आशा आहे की, हे दोघेही संघात दमदार पुनरागमन करतील. पण जर हार्दिकसारख्या खेळाडूला कसोटी क्रिकेट खेळायचे नसेल, तर त्याच्यासारख्या अन्य खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळाने की नाही. जर नियम सर्व खेळाडूंना समान लागू होऊ शकत नसतील, तर भारतीय संघाला जे काही परीणाम साधायचे आहेत ते साध्य करू शकणार नाही."

नेमकं घडलंय तरी काय जाणून घ्या...

ईशान किशन आणि हार्दिक पंड्या हे सध्याच्या घडीला एकत्र सराव करत आहे. बीसीसीआयने ईशान किशनला रणजी स्पर्धा खेळायला सांगितली होती, पण तो ही स्पर्धा खेळला नाही. आपण हार्दिक पंड्यासारखेच कसोटी क्रिकटचा विचार करत नसल्याचे ईशान किशनने बीसीसीआयला सांगितले होते. पण हार्दिक पंड्या हा बऱ्याच कालावधीपासून भारताच्या कसोटी क्रिकेटपासून लांब आहे, तर ईशान काही दिवसांपूर्वीही भारतीय संघात होता. ईशानला कसोटी संघातही स्थान मिळाले असते. पण त्याने बीसीसीआयचे म्हणणे न ऐकता त्यांचा अनादर केला. या गोष्टीचे पडसाद बीसीसीआयच्या करारात उमटले आणि त्यामुळे ईशान किशनला बीसीसीआयने कराराबाहेर ठेवले आहे.

ईशान किशन हा हार्दिक सारखेच करायला गेला. पण बीसीसीआयने काय सांगितले हे तो विसरला. त्यामुळे आता त्याला बीसीसीआयने करारात स्थान दिले नसल्याचे समोर आले आहे.

2024-02-29T07:37:01Z dg43tfdfdgfd