ईशान किशन पुन्हा बीसीसीआयच्या निशाण्यावर, तोडला मोठा नियम... आता शिक्षा होणार?

Ishan Kishan Break Rule : जेव्हा वाईट काळ सुरु असतो तेव्हा लहानसहान चुकांकडेही सगळ्याचं लक्ष जातं. भारताचा युवा विकेटकिपर आणि फलंदाज ईशान किशनबाबत (Ishan Kishan) सध्या असंच काहीसं होतंय. टीम इंडियातून (Team India) ब्रेक घेतल्यानंतर त्याचं टीम इंडियात पुनरागमन झालेलं नाही. टीम इंडियाचे प्रमुक प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या सल्लाकडे त्याने दुर्लक्ष केलं तसंच बीसीसीआयच्या आदेशाकडेही कानाडोळा केला. याचा फटका त्याला आता सहन करावा लागतोय. बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंच्या कॉन्ट्रॅक्ट लीस्टमधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 

ईशान पुन्हा बीसीसीआयच्या निशाण्यावर

ईशान किशनला खेळाडूंच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून बाहेर काढण्यात आलंय. हे कमी की काय आता पुन्हा एकदा ईशान किशन बीसीसीआयच्या निशाण्यावर आला आहे. डिसेंबर 2023 मध्ये टीम इंडियातून ईशान किशनने वैयक्तिक कारणाने माघार घेतली. इतकंच नाही तर रणजी ट्रॉफी स्पर्धेतही खेळण्यास त्याने नकार दिला. यादरम्यान तो आयपीएलचा सराव करताना दिसला. बडोद्यात किरण मोरे क्रिकेट अकादमीत ईशान किशन मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याबरोबर सराव करत होता. 

यामुळे टीम इंडियात खेळायचं असल्यास स्थानिक स्पर्धांमध्ये खेळावं लागेल असा इशाराच बीसीसीआयने ईशान किशनला दिला. सध्या ईशान किशन मुंबई सुरु असलेल्या डीवाय पाटील टी0 टूर्नामेंटमध्ये खेळतोय. पण या स्पर्धेतही त्याने एक चूक केली. बीसीआयचा एक मोठा नियम त्याने मोडला असून याची त्याला शिक्षा भोगावी लागणार आहे. 

ईशानने मोडला नियम

डि वाय पाटील टी20 स्पर्धेत ईशान किशन रिलायन्स संघातून खेळतोय. पण या स्पर्धेत तो फलंदाजीला उतरल्यावर त्याच्या हेल्मेटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ईशान किशनने या स्पर्धेसाठी जे हेल्मेट वापरलं आहे, त्या हेल्मेटवर बीसीसीआयचा लोगो आहे. बीसीसीआच्या नियमानुसार स्थानिक स्पर्धांमध्ये खेळाडू हेल्मेट, जर्सी किंवा क्रिकेटच्या कोणत्याही वस्तूंवर बीसीसीआयचा लोगो वापरु शकत नाही. 

टीम इंडियासाठी खेळणारे खेळाडू स्थानिक क्रिकेट खेळताना आपापल्या होम टीमच्या लोगोचा वापर करतात. बीसीसीआयने कठोर नियम लागू केल्यानंतर काही खेळाडू बीसीसीआयच्या हेल्मेटवर चिकटपट्टी लावून लोगो लपवत होते. पण यालाही बीसीसीआयने आक्षेप घेतला. ईशान किशनने लोगोवर टेपही चिकटवली नव्हती. बीसीआयचा लोगो असेलेलं हेल्मेट घालून तो स्थानिक स्पर्धेत खेळला. त्यामुळे बीसीआयकडून त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

एक दिवस आधीच शिक्षा

या प्रकाराच्या एक दिवस आधीच ईशान किशनला बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून डच्चू दिला होता. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ईशान किशनाल स्थानिक क्रिकेट खेळण्याचे आदेश दिले होते. पण यानंतरही तो रणजी ट्रॉफीत खेळला नव्हता. 

2024-02-29T16:21:09Z dg43tfdfdgfd