कोट्यधीश आहेत भारताच्या टी-२० वर्ल्डकप संघातील खेळाडू; अव्वल स्थानी माजी कर्णधार, सर्वात कमी संपत्ती या खेळाडूची

नवी दिल्ली : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतमध्ये संयुक्तपणे होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकातील स्पर्धेत बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या १५ सदस्यीय संघात खेळाडू रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहेत. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या हार्दिक पंड्याला भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधारपद देण्यात आले आहे. संघात समाविष्ट असलेले प्रत्येक खेळाडूची नेटवर्थ करोडोमध्ये असली तरी या यादीत रोहित शर्मा आणि विराट कोहली अव्वल स्थानी आहेत.पाहा किती आहे या खेळाडूंची नेटवर्थ…

कोहली अव्वल स्थानावर

किंग कोहली या यादीत सर्वात अव्वल स्थानावर आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये त्याचे नाव येते. कोहलीची एकूण नेटवर्थ १२७ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास १०४६ कोटी रुपये इतकी आहे. विराटची वार्षिक सरासरी कमाई १५ कोटी इतकी आहे. बीसीसीआयच्या ए+ कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून तो वर्षाला ७ कोटी रुपये कमावतो. तसेच विराट सोशल मिडिया आणि ब्रँड एंडोर्समेंट तसेच गुंतवणुकीच्या माध्यमातूनही मोठी कमाई करतो. विराट कोहली हा एक ब्रँड आयकॉन असून तो अनेक ब्रँडचे प्रतिनिधित्व करतो. प्युमा, बुस्ट यासारख्या ब्रँडसह १९ हून अधिक ब्रँड्सच्या जाहिरातीत तो दिसतो.

रोहित शर्माची नेटवर्थ

रिपोर्टनुसार कोहलीनंतर आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि भारतीय संघाचे कर्णधार रोहित शर्मा याचा क्रमांक लागतो. रोहितची एकूण नेटवर्थ सुमारे २१४ कोटी रुपये इतकी आहे. त्याच्या संपत्तीत आयपीएलमधून मिळणारी कमाई, ब्रँड एंडोर्समेंट आणि विविध स्टार्टअप्समध्ये केलेली गुंतवणूक यांचा समावेश होतो. मुंबईतील वरळी येथील त्याच्या घराची किंमत जवळपास ३० कोटीपर्यंत असल्याचे सांगितले जाते. एवढेच नाही तर याशिवाय अनेक स्टार्टअप्समध्ये त्यांनी एकूण ८९ कोटींची गुंतवणूक केली आहे. त्याचसोबत रोहित शर्मा स्वत: तब्बल १२ ब्रँड्सचे समर्थन करतो.

इतर खेळाडूंची नेटवर्थ

रवींद्र जडेजा - १२० कोटी

ऋषभ पंत - १०० कोटी

हार्दिक पंड्या - ९१ कोटी

संजू सॅमसन - ८२ कोटी

जसप्रीत बुमराह - ५५ कोटी

अक्षर पटेल - ४९ कोटी

युजवेंद्र चहल - ४५ कोटी

शुभमन गिल - ३४ कोटी

सूर्यकुमार यादव - ३२ कोटी

कुलदीप यादव - ३२ कोटी

शिवम दुबे - २८ कोटी

यशस्वी जयस्वाल - १० कोटी

आवेश खान - २५ कोटी

खलील अहमद - १५ कोटी

अर्शदीप सिंग - १० कोटी

रिंकू सिंह - ७ कोटी

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-02T11:51:14Z dg43tfdfdgfd