कोलकाता नाइट रायडर्सची रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूवर मात, आरसीबीवर ७ विकेटने विजय

बेंगळुरू: आज आयपीएल २०२४ चा १० वा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ६ गडी गमावून १८२ धावा केल्या आणि कोलकात्यासमोर १८३ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात केकेआरने सात गडी राखून विजय मिळवला.

त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दमदार कामगिरी केली. घरच्या मैदानाचा फायदा घेत संघाने २० षटकांत सहा गडी गमावून १८२ धावा केल्या आणि विराट कोहलीच्या नाबाद ८३ धावांच्या खेळीमुळे १८३ धावांचे लक्ष्य ठेवले. संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसिस आठ धावा करून बाद झाला. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कॅमेरून ग्रीनने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. ग्रीन २१ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रसेलने ग्रीनला आपला बळी बनवले. संघाला तिसरा धक्का मॅक्सवेलच्या रूपाने बसला, ज्याला नरेनने आपला बळी बनवले. या सामन्यात रजत पाटीदार आणि अनुज रावत प्रत्येकी तीन धावा करून बाद झाले. पुन्हा एकदा पाटीदार फ्लॉप ठरला. त्याचवेळी दिनेश कार्तिकने कोहलीसोबत सहाव्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी केली. कोलकाताकडून आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर सुनील नरेनला एक यश मिळाले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-29T17:36:53Z dg43tfdfdgfd