क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, IPL 2024 चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर... पाहा कुठे आणि कधी आहे फायनल

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 ला 22 मार्चपासून सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर बीसीसीआयने (BCCI) 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. यात 21 सामने खेळवण्यात येणार आहेत. 17 फेब्रुवारीला भारतीय क्रिकेट बोर्डाने हे वेळापत्रका जाहीर केलं. उर्वरित सामने कुठे होणार, फायनल किती तारखेला आणि कुठे होणार, उर्वरीत आयपीएल भारतातच खेळवणार का असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात होते. क्रिकेट चाहत्यांची ही अपेक्षा अखेर संपली आहे. बीसीसीआयने आयपीएल 2024 चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं आहे. (BCCI Released IPL 2024 Full Scheduled)

यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 74 सामने खेळवल जाणार आहेत. आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकात 21 सामन्यांचं नियोजन करण्यात आलं होतं. 22 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत हे सामने होते. लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आयपीएलचं वेळापत्रक अवलंबून होतं. 

भारतात होणार संपूर्ण आयपीएल

16 मार्चला केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे उर्वरीत सामने परदेशात खेळवले जाणार असं बोललं जात होतं. पण बीसीसीआयने या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. वेळापत्रकानुसार आयपीएलचे सर्व सामने भारतातच खेळवले जाणार आहेत. 

19 मे रोजी ग्रुपचा शेवटचा सामना

पहिल्या टप्प्यात 7 एप्रिलपर्यंत सामने आयोजित करण्यात आले होते. आता 8 एप्रिलपासून 26 मेपर्यंत दुसऱ्या टप्पा खेळवण्यात येणार आहे. 8 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकातना नाईट रायडर्सदरम्यान सामना खेळवला जाणार आहे. ग्रुपचे शेवटचे सामने 19 मे रोजी खेळवले जाताली. या दिवशी डबल हेडर सामने होणार आहे. पहिला सामना म्हणजे दुपारी 3.30 वाजता पंजाब किंग्स इलेव्हन आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने असतील. तर दुसऱ्या म्हणजे संध्याकाळी 7.30 खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स एकमेकांना भिडतील. 

13 शहरं आणि 74 सामने

यावेळचं आयपीएल तब्बल 13 शहरात खेळवण्यात येणार आहे. चेन्नई, बंगळुरु, मुंबई, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, दिल्ली, मोहाली, अहमदाबाद आणि लखनऊ ही दहा प्रमुख शहर असतील. याशिवाय विशाखापट्टणम, गुवाहाटी आणि धर्मशाला इथेही काही सामने खेळवले जातील. 

क्वालिफायर सामने कधी?

आयपीएलच्या वेळापत्रकानुसार 21 मे रोजी क्वालिफायरचा पहिला सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. पॉईंट टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेले संघ आमने सामने असतील. 22 मे रोजी एलिमिनेटरचा सामना होईल. यात पॉईंटटेबलमधले तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरचे संघ भिडतील.  24 मे रोजी क्वालिफायनरचा दुसरा सामना होईल. यात पहिल्या क्वालिफायनलमधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरमधील विजेता संघ खेळतील. तर 26 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर अंतिम सामन्याचा थरार रंगेल.

2024-03-25T12:50:22Z dg43tfdfdgfd