क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं सावट, आयपीएल खेळाडूने केला मोठा गौप्यस्फोट

Match Fixing in Cricket Bengal, Kolkata: आयपीएल खेळाडू श्रीवत्स गोस्वामीने (Shreevats goswami ) मॅच फिक्सिंगसंदर्भात गंभीर आरोप केला आहे. कोलकाता लीग क्रिकेट स्पर्धेत (Kolkata league cricket)  मॅचफिक्सिंग (Match Fixing) झालाच्या गौप्यस्फोट त्याने केला आहे. ज्या प्रकारे खेळाडूंना बाद देण्यात आलं ते संशयास्पद असल्याचं त्याने म्हटलंय. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (CAB) फर्स्ट डिव्हिजन लीगचा सामना मॅचफिक्सिंग वाटत होता, असं त्याने म्हटलंय. हा प्रकार पाहून आपण निराश झाल्याचं गोस्वामीने म्हटलं आहे. श्रीवत्स गोस्वामी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळला आहे. 

श्रीवत्स गोस्वामीने आपल्या फेसुबक पेजवर मोहम्मडन स्पोर्टिंग आणि टाउन क्लब दरम्यानच्या सामन्याचा एक व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत. मोहम्मडन स्पोर्टिंगचे फलंदाज टाऊन क्लबला सात अंक मिळावेत यासाठी जाणून बुझून बाद होत होते, असा आरोप गोस्वामीने केला आहे. हा क्लब टीम इंडियाचे माजी मॅनेजर देबब्रत दास यांच्याशी संबंधीत आहे. देबब्रत दास ध्या कॅबचे सेक्रेटरी आहे. दास 2022 मध्ये टीम इंडियाचे इंग्लंड दौऱ्यातील अॅडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर होते. 

श्रीवत्स गोस्वामीने उपस्थित केले प्रश्न

गोस्वामीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, हा सुपर डिव्हिजन सामना आहे. दोन मोठे संघ जे काही करत आहेत, त्याची माहिती कोणाला आहे का? गोस्वामी शेअर केलेल्या व्हिडिओत एक फलंदाज चेंडू सरळ सरळ आपल्या स्टम्पवर जाऊ देत आहे. त्यानंतर तो मैदानातून बाहेर पडताना दिसत आहे. एक फलंदाज स्टम्प आऊट होण्यासाटी वाईड चेंडूवर स्वत:हून क्रिजबाहेर येताना दिसत आहे. 

या विजयामुळे टाऊन क्लबच्या खात्यात सात अंक जमा झालेत. या सामन्यात टाऊन क्लबने 446 धावा केल्या. त्यांच्या शाकिब हबीब गांधीने 223 धावांची खेळी केली. याला आव्हान देताना मोहम्मडन स्पोर्टिंगने 9 विकेट गमावत 281 धावा केल्या. जॉयजीत बसूने सर्वाधिक 100 धावा केल्या.

'हा प्रकार पाहून निराश झालो'

मॅच फिक्सिंगचा हा प्रकार पाहून आपण निराश झाल्याचं श्रीवत्स गोस्वामीने म्हटलं आहे. मला क्रिकेट आवडतं आणि बंगाल संघातून खेळणं हे माझं भाग्य आहे, पण असे प्रकार होत असतील तर ते लाजीरवाणं असल्याचं गोस्वामीने म्हटलंय. क्लब क्रिकेट हा बंगाल क्रिकेटचा आत्मा आहे, त्याला बर्बाद करु नका असं आव्हानही गोस्वामीने केला आहे. दरम्यान गोस्वामी याने आरोप केल्यानंतर कॅबचे अध्यक्ष स्नेहाशीष गांगुलीने या सामन्याचा अहवाल मागवला आहे. 

कोण आहे श्रीवत्स गोस्वामी

श्रीवत्स गोस्वामीने 2023 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 99 सामन्यात 3019 धावा केल्या आहेत. यात 225 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तर 4 शतंक आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात गोस्वामी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून खेळला होता. आयपीएलमध्ये तो एकूण 31 सामने खेळला असून यात त्याने 293 धावा केल्या आहेत.2008 मध्ये तो अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. 

2024-03-01T08:07:51Z dg43tfdfdgfd