खेळाडूंनी कसोटी सामन्यानंतर विश्रांती घेतल्यावर गावस्करांनी व्यक्त केली नाराजी, या गोलंदाजाला सुनावले खडे बोल

वर्कलोड मॅनेजेमेंट हे टीम इंडियासाठी मोठे आव्हान ठरले आहे. पण कोणत्याही खेळाडूने ही तक्रार करुन अंतराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती मागणे यास गावस्कर सहमत नाही. त्यांनी सांगितल्यानूसार, खेळाडूंना प्रत्यक्षात वर्कलोड मॅनेजमेंट करायचे असल्यास त्यांनी IPL देखील खेळण्यास नकार दिला पाहीजे. विश्रांती घ्यावी मात्र देशासाठी आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास मागे हटू नये. कर्णधार रोहीत शर्मा याने रांची टेस्टनंतर गोलंदाज जसप्रीत बूमराह याला विश्रांती दिली या अनुषंघाने ते बोलत होते.

आकाशदीपने सावरली बाजूभारत इंग्लंड कसोटी दरम्यान भारताचा उपकर्णधार जसप्रीत बूमराह याला इंग्लंड विरुद्ध रांची येथे झालेल्या टेस्ट सामन्यात विश्रांती देण्यात आली. विराट कोहली व के एल राहूल हे देखील या सामन्यासाठी उपस्थित नव्हते. मात्र या वेळी बूमराहच्या जागी आकाशदीप सिंह याला संधी देण्यात आली. यावेळी उत्तम कामगिरी करत त्याने क्रिकेट प्रेमींची मने जिंकली. बेन डकेट, जॅक क्राऊली व ऑली पॉप यांच्या तीन महत्वाच्या विकेट्स त्याने मिळवल्या.

बूमराहला का विश्रांती देण्यात आली?

देशाचे महान फलंदाज सुनिल गावस्कर यांनी एका आर्टिकलमधून याविषयी मोकळेपणाने भाष्य केले. राजकोट टेस्टमध्ये पहील्या डावात १५ व दुसऱ्या डावात ८ ओव्हर्स करुनही जसप्रीत बूमराहला विश्रांती देण्यात आली. त्याने केलेल्या एकूण २३ ओव्हर्स गोलंदाजीमुळे नक्कीच थकवा आला नसेल तरीही त्याला विश्रांती देण्यात आली यावर सुनील गावस्करांनी प्रश्न उपस्थित केला.

2024-03-04T10:02:52Z dg43tfdfdgfd