गौतम गंभीरचे अचानक राजकारण सोडल्यानंतर मोठे वक्तव्य, खरी गोष्ट आणली आता समोर....

नवी दिल्ली : गौतम गंभीरने अचानक राजकारणाला सोडचिठ्ठी दिली. राजकारण सोडल्यावर गौतम गंभीरने एक मोठे वक्तव्य केले आहे. गंभीरचा नवीन व्हिडिओ आता क्रिकटे विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे.

गौतम गंभीरकडे आता कोणती नवीन जबाबदारी असेल, पाहा...

गौतम गंभीरने आता राजकारम सोडले आहे. त्यामुळे यापुढे तो खासदार नसेल. पण एक नवीन जबाबदारी गंभीरकडे असणार आहे. गंभीर हा एक दिग्गज खेळाडू होता. त्याचबरोबर गंभीरने दमदार नेतृत्वही केले आहे.. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व करत असताना त्याने केकेआरला दोनवेळा आयपीएलचे जेतेपद जिंकवून दिले होते. आता गंभीरकडे एक मोठी जबाबदारी आली आहे. गंभीर हा आयपीएलमध्ये आता केकेआरचा मार्गदर्शक असणार आहे. ही नवीन जबाबदारी गंभीर कशी पेलवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला आहे, जाणून घ्या...

गंभीर यावेळी म्हणाला की, " आयपीएल ही जगातील सर्वात आव्हानात्मक लीग आहे. कारण तिचे मापदंड आणि स्पर्धेचा स्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सारखाच आहे. मी सुरुवातीपासूनच हे स्पष्ट केले आहे की, माझ्यासाठी आयपीएल ही एक गंभीर क्रिकेट स्पर्धा आहे. हे बॉलीवूड, वैयक्तिक अजेंडा किंवा मॅचनंतरच्या पार्ट्यांबद्दल मी बोलत नाही. हे स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याबद्दल आहे, म्हणूनच मला वाटते की ही जागतिक स्तरावरील सर्वात कठीण लीग आहे. योग्य क्रिकेटसाठी हे व्यासपीठ आहे."

गंभीर व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणाला, पाहा...

गंभीर पुढे म्हणाला की, " कोलकाताचे चाहते सर्वात भावूक आहेत. चाहत्यांनी प्रामाणिक राहून नेहमीच चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न केला. यासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आयपीएलच्या पहिल्या तीन वर्षांत कोलकात्याच्या चाहत्यांनी खूप काही सहन केले आहे आणि ते आमच्या समर्पणाला पात्र आहेत. ग्लॅमरने काही फरक पडत नाही, असे मी नेहमीच मानतो. क्रिकेटच्या मैदानावरील आमची कामगिरीच आम्हाला परिभाषित करते. केकेआरला त्यांच्या मैदानाबाहेरील गोष्टींसाठी नव्हे, तर त्यांच्या मैदानावरील कामगिरीसाठी ओळखले जावे असे मला कायम वाटत आले आहे. त्यासाठी संघाची कामगिरी तशीच दमदार व्हायला हवी. त्यासाठी आम्ही यापुढेही प्रयत्नशीन राहू. चाहते हेच आमचा प्राण आहेत, कारण त्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही मैदानात उतरत असतो. त्यमुळे यापुढेही आम्ही चाहत्यांसाठी सर्वस्व पणाला लावण्याचा प्रयत्न करू."

गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली आता केकेआरचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

2024-03-04T08:17:42Z dg43tfdfdgfd