गुरु ठोको ताली, आ रहे पाजी! नवजोत सिंह सिद्धूंची पुन्हा क्रिकेटमध्ये एन्ट्री

Navjot Singh Sidhu In IPL 2024 : ये वही बात हुई कि अगर मेरी चाची की मुछें होती तो मैं उसे चाचा कहता (गुरु ठोको ताली...) म्हणत क्रिकेटप्रेमींना नव्या उद्भावना निर्माण करणारे टीम इंडियाचे माजी स्टार खेळाडू आणि काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धूंची (Navjot Singh Sidhu Commentary) पुन्हा क्रिकेटमध्ये एन्ट्री होणार आहे.  नवजोत सिंह सिद्धू पुन्हा आपल्या जुन्या खेळपट्टीवर म्हणजेच क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये पुनरागमन करणार आहे. पुन्हा आपल्या स्टाईलने हातात माईक घेऊन स्टारकास्टमध्ये नवजोत सिंह सिद्धू दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीला बगल देऊन  नवजोत सिंह सिद्धू आपल्या आवडत्या क्षेत्रात आगमन करत आहेत. त्यामुळे आता आकाश चोप्रा आणि नवजोत सिंह सिद्धूची (Navjot Singh Sidhu) जुगलबंदी पाहण्याजोगी असेल.

नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा आपल्या जुन्या खेळपट्टीवर म्हणजेच क्रिकेट समालोचनाकडे परतले आहेत. IPL 2024 मध्ये ते स्टार स्पोर्ट्ससाठी माईक हातात धरताना दिसणार आहे, असं ब्रॉडकास्टरने सांगितलं आहे. अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने त्याच्या अधिकृत 'X' खात्यावर याची माहिती दिली. हा बुद्धिमान माणूस, महान सिद्धू स्वतः आमच्या स्टारकास्टमध्ये सामील झाला आहे, असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं. आंकड़े मिनीस्कर्ट की तरह होते हैं, उससे जितना ढक जाए कुछ छिपता नहीं, म्हणत आता सिद्धूपाजी कोणत्या क्रिकेटरचे वाभाडे काढणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

सिद्धूंची लोकसभेला बगल

पंजाबमध्ये 1 जून रोजी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. सिद्धूंना लोकसभेचं तिकीट मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांनी कूस बदलल्याचं पहायला मिळतंय. काँग्रेस हायकमांडने अद्याप 13 जागांसाठी पक्षाचे उमेदवार जाहीर केले नसले तरी सिद्धू यांनी त्यापासून दूर राहण्याचे जाहीर केले आहे. 

नवजोत सिंह सिद्धूंची कारकीर्द

नवजोत सिंह सिद्धूंची कारकीर्द पहायला गेली तर, 1983 ते 1998 अशी 15 वर्षांची होती. या कालावधीत, त्याने 51 कसोटींमध्ये 3202 धावा आणि 136 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4413 धावा केल्या, ज्यात 15 शतके आणि 48 अर्धशतकांचा समावेश आहे. क्रिकेट सोडल्यानंतर त्यांनी माईक हातात घेतला अन् क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केलं. 

2024-03-19T10:51:14Z dg43tfdfdgfd