चैन्नईच्या आखाड्यात आरसीबी चितपट, रुतुराजने पहिल्याच सामन्यात फडकवला विजयाचा झेंडा

चेन्नई सुपर किंग्जने विजयी सुरूवात केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला आहे. आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात आरसीबीच्या मोठ्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही पण तरीही संघाने २० षटकात १७३ धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीचा यष्टिरक्षक अनुज रावतने २६ चेंडूत ४८ धावांची शानदार खेळी केली. दिनेश कार्तिकनेही नाबाद ३८ धावा केल्या. दोन्ही खेळाडूंनी ९५ धावांची भागीदारी करत संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले.

तत्पूर्वी, डू प्लेसिसने ३५ धावांची खेळी खेळली पण विराट कोहली २१ धावा करून बाद झाला. मॅक्सवेलला खातेही उघडता आले नाही आणि ग्रीनने केवळ १८ धावा केल्या. पाटीदारानाही खाते उघडता आले नाही. चेन्नई सुपर किंग्जकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक ४ बळी घेतले. तर आरसीबीने दिलेले १७४ धावांचे लक्ष्य सीएसकेने १८.४ षटकांत अवघ्या ४ गडी गमावून पूर्ण केले. संघाकडून रचिन रवींद्रने सर्वाधिक ३७ धावांची, तर शिवम दुबेने ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याचवेळी रवींद्र जडेजा २५ धावा करून नाबाद परतला.

शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी चेन्नईला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांमध्ये ३७ चेंडूत ६६ धावांची नाबाद भागीदारी झाली. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या दुबेने चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३४ धावा केल्या. त्याचवेळी या स्टार अष्टपैलूने १७ चेंडूत २५ धावा केल्या. या सामन्यात दोन्ही फलंदाज अपराजित राहिले. आरसीबीतर्फे कॅमेरून ग्रीनने २ तर यश दयाल आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

2024-03-22T18:35:53Z dg43tfdfdgfd