टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी बाबर आझमचा जलवा, किंग कोहलीचा तो रेकॉर्ड मोडला

Babar Azam World record : पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर बाबर आझम याला, पाकिस्तान क्रिकट बोर्डाने, काही महिन्यापूर्वी पाकिस्तान संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकले होते, पण नुकताच पीसीबीने (Pakistan Cricket Board) घेतलेल्या निर्णयामुळे बाबर आझमने न्यूझीलंडविरूद्धच्या टी20 मालिकेत पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून कमबॅक केलं आहे. या मालिकेत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात 5 सामन्यांची टी20 मालिका रावलपिंडीच्या मैदानावर खेळवली जात आहे. या सिरिजची विशेष गोष्ट म्हणजे बाबर आजमने या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करत, रोहित, कोहली आणि फिंचसारख्या खेळाडूंना मागे टाकलं आहे. 

बाबरने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड

न्यूझीलंडविरूद्धच्या सिरीजमध्ये, पाकिस्तानच्या संघाला जरी तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे, तरी पाकिस्तानकडून बाबर आझमने 29 बॉलमध्ये 4 चौकार आणि 1 षटकार ठोकत 37 धावांची खेळी खेळली होती. या इनिंगसोबतच बाबर आझम हा टी20 इंटरनॅशनलमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जास्त धावा करणार फलंदाज बनला आहे. बाबरने ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन एरॉन फिंच याला मागे टाकत या रेकॉर्डवर आपलं नाव कोरलं आहे. 

कोहली-रोहित या दोघांनादेखील टाकलं मागे

टी20 इंटनॅशनल क्रिकेटमध्ये कॅप्टन म्हणून सर्वात जास्त रन करण्याचा रेकॉर्ड आता बाबर आझमच्या नावावर झाला आहे. बाबरने आतापर्यंत 67 इनिंगमध्ये तब्बल 2246 धावा ठोकल्या आहेत.  या आधी हा रेकॉर्ड एरॉन फिंचच्या नावावर होता, फिंचने 76 इनिंगमध्ये 2236 धावा केल्या आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा फॅब 4 चा हिस्सा असलेला दिग्गज फलंदाज केन विलियमसन याने 71 इनिंगमध्ये 2125 धावा केल्या आहेत, तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर क्रमशः भारतीय क्रिकेट संघाचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघं आहेत. रोहितने 54 इनिंगमध्ये 1648 धावा केल्या आहेत तर, कोहलीने 46 इनिंगमध्ये 1570 धावा केल्या आहेत.

वर्ल्ड कपच्या आधी बाबर आझम फॉर्ममध्ये

2023 च्या ODI वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रदर्शन खूप खराब झाले होते.  यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझमला कर्णधार पदावरून काढले होते आणि बाबरच्या जागेवर टी20 क्रिकेटमध्ये शाहीन शाह अफरीदीला पाकिस्तानचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. मात्र जानेवारीत न्यूझीलंडविरूद्धच्या झालेल्या 5 सामन्यांच्या मालिकेत किवी संघाने पाकिस्तानचा 4-1 ने धुव्वा उडवला होता, या निराक्षाजनक प्रदर्शनामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने परत आपल्या संघाचा दिग्गज आणि अनुभवी फलंदाज बाबर आझमला पाकिस्तानच्या टी20 संघाची जबाबदारी सोपवली आणि त्याल परत कर्णधारपदी नियूक्त करण्यात आलं. या बदलावानंतर पहिल्यादाच पाकिस्तानचा क्रिकेट संघ न्यूझीलंडविरूद्ध टी20 सिरीज खेळत आहे. तर पाकिस्तानी क्रिकेट फँन्सची नजर आता जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप असणार आणि खास करून बाबर आझम हा आपल्या संघाला कशा पद्धतीने सांभाळतो यावर साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

2024-04-22T17:05:57Z dg43tfdfdgfd