टीम इंडियाकडून तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग आणि 64 धावांनी विजय

IND Vs ENG: भारत आणि इंग्लड यांच्यात धर्मशालामध्ये सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा विजय झाला आहे. या विजयामुळे भारताने 4-1 अशा मोठ्या फरकाने सिरिज जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि आश्विनच्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्या धर्मशाला येथे झालेल्या पाचव्या टेस्ट मॅचचा आजचा तिसरा दिवस होता. इंग्लंडची टीम आपला दुसरा डाव खेळत होती. टीम इंडियाने इंग्लंडला पाचव्या टेस्ट मॅचमध्येदेखील धूळ चारली. यानंतर टीम इंडियाने ही सिरिज 4-1 अशी खिशात टाकली. इंग्लंडचा संघ दुसऱ्या इनिंगमध्ये एकमागोमाग एक पॅव्हेलियनमध्ये परतला. जो रुट व्यतिरिक्त कोणालाच चांगला खेळ करता आला नाही. रविचंद्रन आश्विनने दुसऱ्या इनिंगमध्ये 5 विकेट घेतले. जसप्रीत बुमराहला 2 विकेट मिळाल्या तर कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

'या' दोन महिलांचे फोटो शेअर करत सचिनने दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा

इंग्लडची दुसरी इनिंग खूप निराशाजनक राहिली. त्यांचे एकामागोमाग एक विकेट पडत राहिले. शंभरावी टेस्ट खेळणाऱ्या बेन डकेटला आश्विनने आऊट केले. यानंतर जॅक क्राऊली आणि ओली पोपला आऊट केले. हे 3 दिग्गज अवघ्या 36 रन्सच्या आत बाद झाले. यानंतर जॉनी बेयरस्टोने आपली शंभरावी मॅच स्मरणीय बनवण्यासाठी काही चांगले शॉर्ट्स खेळले. पण तोही कुलदीपच्या फिरकीमध्ये फसला आणि एलबीडब्ल्यू झाला. 

यानंतर लंचच्या आधी आश्विनने इंग्लड टीमचा कॅप्टन बेन स्टोक्सला अवघ्या 2 रन्समध्ये परत धाडले. आश्विनच्या फिरकीची जादू लंचच्या नंतरही सुरुच राहिली. यानंतर त्याने इंग्लंडच्या विकेटकिपर बेन फोक्सला आऊट केलं. 

Shubman Gill: ती गोष्ट खाजगी ठेवणं...; अँडरसनसोबत झालेल्या वादावर काय म्हणाला शुभमन गिल?

रोहित-गिलची मजबूत खेळी

तत्पुर्वी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने 154 बॉल्समध्ये आपलं शतक पूर्ण केलं. तर शुभमन गिलने 137 बॉल्समध्ये शतक ठोकलं. विशेष म्हणजे या टेस्ट सिरीजमधील दोघांचंही हे दुसरं शतक होतं. रोहित शर्मा 103 रन्सवर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. तर शुभमन गिल 110 रन्स जेम्स एंडरसनच्या गोलंदाजीवर पॅव्हेलिअनमध्ये परतला. गिलने आपल्या शतकी खेळीत 12 चौकार आणि 5 सिक्स ठोकले. रोहित शर्माचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील हे 48 वं शतकं होतं. रोहित शर्माला बेन स्टोक्सने बाद करताच धर्मशालामध्ये उपस्थित इंग्लंडचे खेळाडू आणि समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र ज्यावेळी रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने गेला तेव्हा त्याला स्टँडिंग ओवेशन दिलं. 

2024-03-09T08:44:39Z dg43tfdfdgfd