टीम इंडियात 'या' धाकड खेळाडूचं होणार पदार्पण, इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर

India Vs England 5th Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना येत्या 7 मार्चपासून धर्मशालेत (Dharmashala) खेळवला जाणार आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडियाने 3-1 अशी आघाडी घेतली आहे. आता चौथा सामना जिंकत इतिहास रचण्याासाठी टीम इंडिया (Team India) सज्ज झाली आहे. या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने (BCCI) युवा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंगचा (Rinku Singh) टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे धर्मशाला कसोटीत रिंकू सिंगचं कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

पाचव्या कसोटी सामन्यासाठी रिंकू सिंग धर्मशालेत दाखल झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने सीरिजवर आधीच 3-1 असा कब्जा केला आहे. त्यामुळे प्रयोग म्हणून शेवटच्या कसोटीत रोहित शर्मा रिंकू सिंगला संधी देऊ शकतो. धर्मशालेत पोहोचल्याची माहिती रिंकू सिंहने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचा प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमबरोबर रिंकू सिंगने एक फोटो शेअर केला आहे. मॅक्युलम आपल्यासाठी नेहमीच प्रेरणा ठरल्याचं रिंकूने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

न्यूझीलंडचा माजी विकेटकिपर आण फलंदाज ब्रँडन मॅक्युलम इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचं त्याने प्रतिनिधित्व केलं होतं. याशिवाय तो केकेआर संघाचा प्रशिक्षकही होता. रिंकू सिंगही आयपीएलमध्ये केकेआर संघातून खेळतो. त्यामुळे मॅक्युलम आणि रिंकू सिंगचं चांगलं बॉण्डिंग आहे. 

इंग्लंडच्या बॅझबॉलला प्रत्युत्तर

टीम इंडियाच्या प्लेईंग 11मध्ये  रिंकूचा समावेश झाल्यास टीम इंडियाची फलंदाजी आक्रमक होणार आहे. रिंकू सिंग बेस्ट फिनिशर म्हणून ओळखला जातो. रिंकू सिंगचा संघात समावेश झाल्यास इंग्लंडच्या बॅझबॉलला चोख प्रत्युत्तर मिळू शकेल. रिंकू सिंगला रजत पाटीदारच्या जागेवर संधी मिळू शकेल. रजत पाटीदार या कसोटी मालिकेत समाधानकारक कामगिरी करण्यात अपयशी ठरलाय.

पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

भारत Vs इंग्लंड कसोटी मालिका

1st कसोटी : 25-29 जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड 28 धावांनी विजयी)

2nd कसोटी : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम  (भारत 106 धावांनी विजयी)

3rd कसोटी : 15-19  फेब्रुवारी, राजकोट (भारत 434 धावांनी विजयी)

4th कसोटी : 23-27  फेब्रुवारी, रांची (भारत 5 विकेटने विजयी)

5th कसोटी : 7-11 मार्च, धर्मशाला

2024-03-05T09:03:56Z dg43tfdfdgfd