तर.. विराट कोहलीची निवड होणार नाही? टी२० विश्वचषकात तरुण खेळाडूंना संधी

मुंबई : विराट कोहलीने आपल्या फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट विश्वात अस्तित्व निर्माण केले आहे. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये अनेक विक्रमांचा झेंडा त्याने रोवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयकॉन असलेल्या कोहली अनेक खेळाडूंचा तो आदर्श आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोहलीने टी२०मध्ये सुमार कामगिरी केली आहे. यामुळे त्याला टी२० संघातील निवडीपासून दूर ठेवण्यात येईल असे सांगितले जात आहे. विराटच्या वाढत्या वयाबरोबर त्याचा खेळ देखील संथ झालेला आहे असे अनेकांना वाटते. संघ निवडकर्ते १ जूनपासून सुरू होणाऱ्या विश्चषकातून विराटला दूर ठेवू शकतात. पण कोहलीला संघात स्थान मिळाले नाही तर भारताकडे इतर कोणते पर्याय असतील हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

भारताकडे अनेक पर्याय उपलब्ध

विश्वचषकातील संघात विराट कोहलीची निवड न झाल्यास संघ व्यवस्थापनाकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विस्फोटक सलामीवीर म्हणून रोहितसह शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड हे खेळाडू भारताकडे आहेत. संघातील खेळाडू अपयशी ठरल्यास त्यांच्याकडे पर्याय म्हणून बघितले जाऊ शकते. त्यानंतर 3 नंबरवरील फलंदाज म्हणून केएल राहुल किंवा संजू सॅमसनचा पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो. सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट गमावण्यापूर्वी, इशान किशनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेत 3 व्या क्रमांकावर प्रयत्न केले गेले आणि डाव्या हाताच्या फलंदाजाने दोन शानदार अर्धशतके झळकावली. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळू शकते, अशा परिस्थितीत रिंकू सिंग, शिवम दुबे आणि रवींद्र जडेजासारखे खेळाडू फिनिशरची भूमिका बजावण्यासाठी पुरेसे आहेत.

विराटला या सगळ्याची कल्पना

मीडिया रिपोर्ट्सनुसार अजित आगरकर विराट कोहलीला तरुणांसाठी ही संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन करू शकतात. अजित आगरकरने याआधीच विराटशी बदलत्या टी-२० फॉरमॅटचा दृष्टिकोन आणि आवश्यकतांबद्दल यापूर्वीच चर्चा केली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत विराटला वेगवान धावा अपेक्षित होत्या, परंतु संपूर्ण मालिकेत तो केवळ 29 धावाच करू शकला.

2024-03-13T05:41:42Z dg43tfdfdgfd