दिल्लीच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, पाहा मॅचनंतर असं घडलं तरी काय

नवी दिल्ली : दिल्लीच्या संघाने अखेरच्या चेंडूवर गुजरात टायटन्सवर थरारक विजय साकारला. पण या दिल्लीच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. हा सामना संपला आणि त्यानंतर मुंबईला कसा मोठा धक्का बसला, हे समोर आले आहे.

ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीच्या संघाने २२४ धावांचा डोंगर उभारला होता. त्यावेळी दिल्लीचा संघ हा सामना सहज जिंकेल, असे वाटले होते. गुजरातचा कर्णधार शुभमन गिल सहा धावांवर बाद झाला, त्यावेळी दिल्ली हा सामना सहज जिंकेल, असे वाटत होते. पण त्यानंतर साई सुदर्शनने तुफानी फटकेबाजी केली आणि अर्धशतकाच्या जोरावर गुजरातला विजयाची आशा दाखवली. त्यानंतर डेव्हिड मिलरनेही अर्धशतक पूर्ण केले, पण त्यानंतर तो लगेच बाद झाला. या सामन्यात खरी रंगत भरली ती रशिद खानने. रशिदने अखेरच्या षटकांत वादळी फटकेबाजी केली. त्यामुळे गुजरातचा अखेरच्या चेंडूवर पा धावांची गरज होती. पण रशिदला मोठा फटका मारता आला नाही आणि दिल्लीने चार धावांनी विजय साकारला.

या सामन्यापूर्वी दिल्लीच्या संघाने आठ सामने खेळले होते. या आठ सामन्यांमध्ये त्यांना पाच सामने गमवावे लागले होते, तर त्यांना तीन विजय मिळवता आले होते. या तीन गुणांसह दिल्लीच्या खात्यात सहा गुण होते. या सहा गुणांसह दिल्लीचा संघ हा गुणतालिकेत आठव्या स्थानावर होता, तर मुंबईचा संघ हा सातव्या आणि गुजरातचा संघ सहाव्या स्थानावर होता. या सामन्यात दिल्लीने विजय साकारला. हा त्यांचा चौथा विजय ठरला. या चौथ्या विजयासह दिल्लीच्या संघाचे आता आठ गुण झाले आहेत. या आठ गुणांसह दिल्लीच्या संघाने थेट सहावे स्थान पटकावले आहे. हे सहावे स्थान पटकावताना दिल्लीने मुंबई इंडियन्सला धक्का दिला आहे. कारण या सामन्यापूर्वी ते सातव्या स्थावावर होते, तर दिल्लीच्या विजयानंतर त्यांची आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे सामना न खेळताही मुंबई इंडियन्सच्या संघाला एक स्थान पिछाडीवर जावे लागले आहे.

दिल्लीच्या संघाने यावेळी फक्त मुंबई इंडियन्सलाच धक्का दिला नाही तर त्यांनी गुजरातलाही धक्का दिला आहे. कारण या सामन्यापूर्वी गुजरातचा संघ हा सहाव्या स्थानावर होता, तर दिल्लीचा संघ आठव्या स्थानावर होता. पण दिल्लीने या सामन्यात विजय साकारला आणि त्यामुळे आठ गुणांसह त्यांनी सहावे स्थान पटकावले आहे. त्यामुळे गुजराताच संघ जो सहाव्या स्थानावर होता, त्यांची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे दिल्लीने एकाच सामन्यानंतर गुणतालिकेत दोन संघांना धक्के दिले आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-24T18:40:55Z dg43tfdfdgfd