'धोनीने त्यापेक्षा संघ सोडला असता तर...', माजी भारतीय क्रिकेटपटूने कर्णधारपदावरुन सुनावलं, 'उगाच ऋतुराजला...'

IPL 2024: आयपीएलच्या पूर्वसंध्येला चेन्नई सुपरकिंग्जने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. चेन्नईचा स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडलं असून, ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं असल्याचं संघाने जाहीर केलं आणि चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. या निर्णयामागे नवा कर्णधार तयार करण्याचं धोरण असू शकतं. महेंद्रसिंह धोनीचा हा शेवटचा हंगाम असण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत तो संघात असताना ऋतुराज गायकवाडला मदत करत कर्णधार म्हणून सक्षम नेतृत्व उभा करु शकतो. पण भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरने या निर्णयावरुन टीका केली आहे. जर धोनी संघात नसता तर ऋतुराज गायकवाडला जास्त सहज गेलं असतं असं स्पष्ट मत त्याने नोंदवलं आहे. 

वसीम जाफरने धोनीने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाची वेळ याकडे लक्ष वेधत टीका केली आहे. धोनी आयपीएलमधूनच बाहेर पडला असता तर जास्त योग्य ठरलं असतं असं वसीम जाफरचं म्हणणं आहे. "जर धोनी आजुबाजूला नसता तर जास्त अर्थपूर्ण ठरलं असतं. त्याने निवृत्ती घेतली आहे आणि तो आपल्या आजुबाजूला नाही या गोष्टीने कर्णधाराचं आयुष्य फार सोपं गेलं असतं. आता महेंद्रसिंह धोनी आजुबाजूला असताना तर कोणत्याही कर्णधाराला आपली जबाबदारी पार पडणं अवघड जाईल," असं वसीम जाफरने ESPNCricinfo ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. 

धोनीने अचानक घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय? CEO चं विधान चर्चेत, 'मला फोटोशूटच्या आधीच...'

 

यावेळी वसीम जाफरने ऋतुराज गायकवाडवर जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा धोनी सहमत नसतानाही तो सोयीस्करपणे घेऊ शकेल का? अशी विचारणा केली. त्यामुळे धोनीची पूर्ण अनुपस्थिती असती तर ऋतुराज गायकवाडला आपल्या कर्णधारपदाचा कार्यकाळ सुरु करणं जास्त सोपं गेलं असतं असं म्हटलं आहे. 

"जर ऋतुराजने एखादा निर्णय घेतला आणि महेंद्रसिंह धोनी त्याच्याशी सहमत असेल किंवा नसेल. त्याला तो निर्णय आवडत असो अथवा नको. तुम्हाला स्वत:लाच निर्णय घ्यायचा आहे. ऋतुराज गायकवाड उत्तराधिकारी झाला असता हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण मला वाटतं की धोनी नसता तर. ते खूप सोपे झालं असतं," असं वसीम जाफरने सांगितलं आहे. 

चेन्नईचं प्रसिद्धीपत्रक

चेन्नईने प्रसिद्धीपत्रक जारी करत ऋतुराज गायकवाड आगामी हंगामात कर्णधार असेल याची अधिकृत माहिती दिली आहे. यात सांगण्यात आलं आहे की, "आगामी आयपीएल 2024 साठी महेंद्रसिंह धोनीने चेन्नईचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं आहे. 2019 पासून ऋतुराज चेन्नई संघाचा महत्त्वाचा भाग असून त्याने संघासाठी एकूण 52 सामने खेळले आहेत".

2024-03-22T08:12:54Z dg43tfdfdgfd