'पांड्याला संघातच पाठिंबा मिळत नाहीये, धोनीचं नाव घेत त्याने...,' अ‍ॅडम गिलक्रिस्टचं मोठं विधान, 'तो फार...'

IPL 2024:  आयपीएलचा सध्याचा हंगाम मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची प्रचंड निराशा करणारा ठरत आहे. आधीच कर्णधार बदलल्याने मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज असताना, दुसरीकडे सामन्यांमध्येही त्यांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. रोहित शर्माची जागा घेतल्याने चाहत्यांच्या रोषाला सामोरं जाव लागणारा हार्दिक पांड्या आपल्या नेतृत्वातून सर्वांना उत्तर देईल अशी अपेक्षा होती. पण तसं झालं नाही आणि हार्दिक पांड्याविरोधातील राग आणखीनच वाढू लागला आहे. चेन्नई सुपरकिंग्जविरोधात झालेल्या पराभवाने यात भर घातली आहे. या सामन्याआधी हार्दिक पांड्याच्या नेतृत्व कौशल्यावर टीका होत होती. पण आता तर त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजीवरही टीका होत आहे. 

दरम्यान चेन्नई सुपरकिंग्जविरोधात झालेल्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने जी विधानं केली आहेत, त्यावरुन ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू अॅडम गिलक्रिस्टने एक मत तयार केलं आहे. यानुसार मुंबई इंडियन्स संघात सर्व काही आलबेल नाही असं चित्र दिसत असल्याचं गिलक्रिस्ट म्हणाला आहे. 

"हायप्रोफाईल संघ आपल्याच यशाचे पीडित आहेत. अनेकदा अशा काही गोष्टी समोर येतात ज्या चाहत्यांना निराश करतात. आम्हाला हे मान्य नाही असं त्यांचं म्हणणं असतं. आपण या मोठ्या चित्राचे भाग आहोत आणि आपल्याला अंधारात ठेवलं आहे असं त्यांना वाटतं. ज्याप्रकारे अचानक हार्दिक पांड्याला ट्रेड करण्यात आल्याची बातमी अचानक आली आणि त्यानंतर रोहितच्या जागी त्याला नेतृत्व देण्यात आलं. यानंतर रोहित आनंदी आहे की नाही, त्याला विचारण्यात आलं की नाही अशा चर्चा रंगल्या. यामुळेच लोक भावना व्यक्त करत आहेत," असं गिलक्रिस्टने Cricbuzz शी संवाद साधताना म्हटलं.

पण हार्दिकने केलेल्या एका विधानाने गिलक्रिस्टचं लक्ष वेधून घेतलं. ज्यामध्ये त्याने चेन्नई सुपरकिंग्जला धोनीच्या सल्ल्यांचा फायदा होत असल्याचं म्हटलं. यावरुन मुंबई इंडियन्स संघात असं होत नसल्याचं तो सुचवत आहे असं दिसत आहे. "स्टम्पच्या मागे उभा व्यक्ती नेमक्या कोणत्या गोष्टी प्रभावी आहेत सांगत आहे," असं हार्दिक म्हणाला आहे.

हार्दिकच्या या विधानावर गिलक्रिस्ट म्हणाला की, "त्याने धोनीबद्दल केलेलं विधान थोडी रोचक आहे. आपल्याला सध्या एकटं वाटत असल्याचं तो कदाचित सांगत आहे. आपल्याला हवा तसा पाठिंबा मिळत नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न तो करत असावा. कारण त्याच्या बोलण्यावरुन ऋतुराज गायकवाडला अनुभवी खेळाडूकडून पाठिंबा मिळत असल्याचं सांगत असल्याची जाणीव होत आहे. यावरुन या क्षणी हार्दिकची मानसिकता आणि मुंबई इंडियन्स डगआउटमधील अनिश्चितता आणि संकोच याबद्दल मला थोडंसं सांगते".

मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 6 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. यासह ते गुणतालिकेत 8 व्या स्थानी आहेत. तर चेन्नई सुपरकिंग्ज संघ तिसऱ्या स्थानी आहे. 

2024-04-16T11:30:46Z dg43tfdfdgfd