पाचव्या कसोटीत भारतीय संघात दोन मोठे बदल, पाहा कशी असेल PLAYING XI

धरमशाला : भारताने या कसोटी मालिकेत काही युवा खेळाडूंना पदार्णाची संधी दिली आहे. पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातही भारतीय संघात आता अजून एका खेळाडूला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते, असे आता समोर येत आहे. कारण या पाचव्या कसोटीत दोन मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पहिला बदल...

या पाचव्या कसोटीत भारतीय संघात पहिला बदल हा गोलंदाजीमध्ये होणार आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली होती. पण धरमशाला येथील वातावरण आणि खेळपट्टी पाहता या सामन्यात जसप्रीत बुमराह कमबॅक करणार असल्याचे दिसत आहे. कारण बुमराहने आतापर्यंतच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. येथील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. बुमराह हा भारतीय संघाचा अव्वल वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे या अखेरच्या सामन्यात भारतीय संघात बुमराहचे पुनरागमन होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.

दुसरा बदल...

भारतीय संघात दुसरा बदल हा फलंदाजीत होणार असल्याचे समजते आहे. कारण या मालिकेत गेल्या तीन सामन्यांमध्ये रजत पाटीदारला संधी देण्यात आलेली आहे. पण रजतला अजूनही आपली छाप पाडता आलेली नाही त्यामुळे या पाचव्या कसोटी सामन्यासाठी रजतला भारतीय संघातून डच्चू दिला जाऊ शकतो. रजतचा जागी भारतीय संघात देवदत्त पडीक्कलला संधी दिली जाऊ शकते. कारण पडीक्कल हा डावखुरा फलंदाज आहे. त्याचबरोबर रजत अपयशी ठरत असताना एक चांगला पर्याय भारतीय संघासमोर आहे. त्यामुळे या सामन्यासाठी हा एक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय संघासाठी हा पाचवा सामना महत्वाचा असेल. कारण या सामन्यात भारताने विजय मिळवला तर त्यांना मालिका ४-१ अशी जिंकता येऊ शकते. त्याचबरोबर या विजयाने खेळाडूंना मानसीक बळही मिळू शकते. त्यामुळे या सामन्यासाठी भारतीय संघात नेमके कोणते बदल होतात आणि त्यांची कामगिरी कशी होते, याकडे तमाम क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले असेल.

2024-03-06T14:23:58Z dg43tfdfdgfd