पाचव्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला मिळाली गुड न्यूज, WTC POINTS TABLE मध्ये घडला चमत्कार

नवी दिल्ली : भारताचा पाचवा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वीच त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आली आहे. कारण आज WTC Points Table जाहीर करण्यात आले आणि त्यामध्ये एक चमत्कार पाहायला मिळाला आहे. त्यामुळे कसोटी सामना न खेळत असतानाही भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

WTC Points Table मध्ये नेमकं घडलं तरी काय...

रविवारी WTC Points Table मध्ये मोठा बदल झाला. भारताने जेव्हा इंग्लंडला चौथ्या कसोटी सामन्यात पराभूत केले होते. तेव्हा भारतीय संघाची यशाची टक्केवारी ही ६४.५८ एवढी झाली होती, त्याचबरोबर भारताने ६२ गुण झाले होते. पण विजयानंतरही भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर होता. कारण अव्वल स्थानावर न्यूझीलंडचा संघ होता आणि त्यांची यशाची टक्केवारी भारतापेक्षा जास्त होती. पण आता या गुणतालिकेच मोठा बदल झाला आहे. कारण न्यूझीलंडचा संघ आता या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतीय संघ हा अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. हा मोठा बदल नेमका कसा घडला, हेदेखील आता समोर आले आहे.

WTC Points Table मध्ये भारत सामना न खेळताही अव्वल स्थानी कसा...

भारतीय संघ सध्याच्या घडीला कसोटी सामना खेळत नाही आहे. पण दुसरीकडे न्यूझीलंडचा कसोटी सामना हा ऑस्ट्रेलियाबरोबर सुरु होता. या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाने १७२ धावांनी पराभूत केले. न्यूझीलंडचा हा मोठ पराभव होता. या पराभवामुळे न्यूझीलंडच्या यशाची टक्केवारी घसरली आहे. पराभवानंतर सध्याच्या घडीला न्यूझीलंडच्या यशाची टक्केवारी ही आता ६०.०० एवढी आहे, तर भारताची ६४.५८ अशी आहे. या गुणतालितेक कोणत्या संघाला कोणते स्थान मिळणार हे यशाच्या टक्केवारीवरून ठरत असते. भारताची यशाची टक्केवारी ही न्यूझीलंडपेक्षा जास्त आहे. त्यामुळे न्यूझीलंडची या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे, तर भारतीय संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

भारताला अव्वल स्थान टिकवण्यासाठी काय करावे लागेल...

भारताला जर अव्वल स्थान टिकवायचे असेल तर त्यासाठी आता त्यांना पाचव्या आणि अखेरच्या कसोटीतही विजय मिळवावा लागेल. जर भारतीय संघाला या पाचव्या सामन्यात पराभव पत्करावा लागला तर त्यांची दुसऱ्या स्थानावर घसरण होऊ शकते. त्यामुळे इंग्लंडविरुद्धचा पाचवा सामना हा भारतासाठी महत्वाचा असेल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना हा धरमशाला येथे होणार आहे.

2024-03-03T12:45:23Z dg43tfdfdgfd