पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात मॅचविनरची एंट्री, रोहित शर्माची चिंता मिटली

टा चेन्नई : भारतासाठी पाचवा कसोटी सामना हा महत्वाचा असेल. त्यासाठी आता भारतीय संघात एक मोठा बदल होणार आहे. त्यासाठी आता पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात एका मॅचविनर खेळाडूची एंट्री होणार आहे. त्यामुळे आता रोहित शर्माची चिंता मिटलेली आहे.

मॅचविनर खेळाडूची संघात निवड का करण्यात येणार...

भारताचा पाचवा सामना हा धरमशालेच्या मैदानात होणार आहे. चौथ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. पण काही गोष्टी अशा होत्या, ज्यामुळे सामना भारताच्या हातून निसटूही शकतो. त्यामुळे आता पाचव्या सामन्यासाठी रोहितने चांगलीच कंबर कसली आहे. कारण आता पाचव्या सामन्यासाठी संघ निवडताना रोहित शर्माने संघात एक मोठा बदल केला आहे. हा बदल करताना रोहित शर्माने एका दिग्गज खेळाडूला संघात स्थान दिले आहे.

पाचव्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणाची एंट्री होणार, जाणून घ्या....

पाचवा कसोटी सामना हा धरमशालाच्या मैदानात होणार आहे. येथील वातावरण आणि खेळपट्टी पाहिली तर गोलंदाजांची भमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी रोहित शर्माने आपला हुकमी एक्का मैदानात उतरवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन होणार आहे. बुमराहने यापूर्वी झालेल्या पहिल्या तिन्ही कसोटी सामन्यांत दमदार कामगिरी केली होती. पण चौथ्या सामन्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. पण आता पाचव्या कसोटी सामन्यासाठी बुमराहचे भारताच्या संघात पुनरागमन होणार आहे. बुमराह हा भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे जर तो संघात परतला तर भारताची गोलंदाजी अधिक बळकट होईल आणि त्यांना सामना जिंकण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकता येईल.

भारतीय संघाने आतापर्यंत या मालिकेत दमदार कामगिरी केली आहे.पहिला सामना त्यांनी गमावला होता. पण त्यानंतर त्यांनी सलग तीन सामने जिंकले आणि ही मालिका खिशात टाकली आहे. त्यामुळे आता पाचव्या सामन्यात ते कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

2024-03-06T12:53:50Z dg43tfdfdgfd