पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

लखनौ: आयपीएल २०२४ च्या ११ व्या सामन्यात, लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी केएल राहुल नाही तर लखनौचा कर्णधार म्हणून निकोलस पुरन नाणेफेकीसाठी आला होता. राहुल हा इम्पैक्ट प्लेयर म्हणून खेळणार असल्याचे त्याने सांगितले.

दरम्यान लखनौ सुपर जायंट्सने मयंक यादव आणि मणिमरन सिद्धार्थ यांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. आता हे बदल लखनौसाठी कितपत प्रभावी ठरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुल दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे तो कर्णधार नाही. त्यांच्या जागी निकोलस पुरन यांनी कमांड घेतली आहे. केएल राहुल एक इम्पैक्ट प्लेयर म्हणून खेळणार आहे. चालू मोसमात शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब संघाचा हा तिसरा आणि लखनौ संघाचा दुसरा सामना आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौचा संघ पहिला सामना हरला आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौचा संघ पहिला सामना हरला होता. तर पंजाबने एक सामना जिंकला आणि दुसरा हरला आहे.

लखनौ सुपर जायंट्स:

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, निकोलस पूरन (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ.

पंजाब किंग्ज:

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-30T14:39:02Z dg43tfdfdgfd