पंजाबच्या विजयाने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हार्दिक पंड्याची चिंता वाढली..

कोलकाता : पंजाब किंग्सच्या संघाने विक्रमी विजय साकारला आणि इतिहास रचला. पंजाबने केकेआरच्या संघाला सर्वात मोठा धक्का दिला. कारण आयपीएलच्या विजयातील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. पण पंजाबच्या या विजयाने आता मुंबई इंडियन्सच्या संघाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण पंजाबचा सामना संपल्यावर एक मोठी गोष्ट समोर आली आणि त्यामुळे आता हार्दिक पंड्याची चिंता वाढलेली आहे.

क्रिकेटमध्ये काहीही शक्य होऊ शकते, हे पंजाबच्या संघाने दाखवून दिले. कारण केकेआरच्या संघाने जेव्हा २६१ धावा केल्या होत्या, तेव्हा पंजाब हा सामना जिंकेल, असे कोणालाही वाटले नव्हते. पण पंजाबच्या फलंदाजांनी ही गोष्ट सत्यात उतरवली. शतकवीर जॉनी बेअरस्टो हा पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. जॉनीला यावेळी शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांनी अर्धशतकं झळकावत चांगली साथ दिली. त्यामुळेच पंजाबच्या संघावा हा विक्रमी विजय साकारता आला. पंजाबचा सामना संपला आणि त्यानंतर मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट बातमी आली.

या सामन्यापूर्वी पंबाजचा संघ प्ले ऑफच्या बाहेर जाईल, असे म्हटले जात होते. कारण या सामन्यापूर्वी पंजाबच्या संघाने आठ सामने खेळले होते. या आठ सामन्यांमध्ये सहा पराभव पत्करावे लागले होते, तर दोनच विजय त्यांना मिळवता आले होते. त्यामुळे पंजबच्या खात्यामध्ये चार गुण होते. पण पंजाबने केकेआरवर विक्रमी विजय साकारला. या विजयासह पंजाबला दोन गुण मिळाले आणि त्यांचा रन रेटही वाढला. त्यामुळे आता पंजाबच्या संघाचे ६ गुण झाले आहेत. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघाचे आठ सामने झाले आहेत. या आठ सामन्यांमध्ये त्यांनी तीन विजय मिळवले आहेत, तर पाच सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाचेही सहा गुण आहेत. पण या सामन्यापूर्वी पंजाबचा संघ हा नवव्या स्थानावर होता, तर मुंबईचा संघ हा आठव्या स्थानावर होता. पण या विजयानंतर सर्व समीकरण बदलले आहे. या विजयानंतर पंजाबच्या संघाने मुंबई इंडियन्सचे आठवे स्थान पटकावले आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाची आता नवव्या स्थानावर घसरण झाली आहे आणि त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

पंजाबच्या संघाने धमाकेदार विजय साकारला, त्यामुळे त्यांना फक्त दोन गुणच मिळाले नाही तर त्यांचा रन रेटही चांगलाच वाढला आहे. त्यामुळे आता या पुढील सामन्यात पंजाबचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-26T18:43:37Z dg43tfdfdgfd