पहिल्या विजयानंतर मुंबईसाठी आली अजून एक गुड न्यूज, सामना संपल्यावर काय घडलं पाहा....

मुंबई : चौथ्या सामन्यात अखेर मुंबई इंडियन्सला पहिला विजय मिळवता आला. त्यामुळे हा विजय मुंबई इंडियन्स आणि त्यांच्या चाहत्यांसाठी खास आहे. पण या पहिल्या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या संघासाठी अजून एक गुड न्यूज आली आहे.

चौथ्या सामन्यासाठी हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सच्या संघात तीन मोठे बदल केले होते. हार्दिकने सूर्याला संधी दिली, पण तो अपयशी ठरलाा. पण यावेळी मुंबईच्या मदतीला धावून आला तो रोमारिओ शेफर्ड. कारण शेफर्डने अखेरच्या षटकात चार षटकार आणि दोन चौकारांसह ३२ धावांची लूट केली. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला २३४ धावांचा डोंगर उभारता आला. मुंबई इंडियन्सने यावेळी २९ धावांनी विजय साकारला, त्यामुळे या अखरेच्या षटकातील फटकेबाजी मुंबईसाठी महत्वाची ठरली. या पहिल्या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या संघासाठी अजून एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचे तीन पराभव झाले होते. त्यामुळे गुणतालिकेत ते तळाला होता, कारण एकही गुण त्यांच्या खात्यामध्ये नव्हता. पण रविवारी मुंबई इंडियन्सने पहिला विजय साकारला. या विजयासह मुंबई इंडियन्सच्या संघाला दोन गुण मिळाले आहेत. या दोन गुणांसह मुंबई इंडियन्सच्या संघाने पॉइंट्स टेबलमध्येही मोठी झेप घेतली आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ हा १० व्या स्थानावर होता. पण या विजयानंतर मिळालेल्या दोन गुणांमुळे मुंबई इंडियन्सचा संघ हा पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानावर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाने शेटवचे स्ठान सोडले आहे. आता आठव्या स्थानावरून मुंबईचा संघ कितव्या स्थानावर पोहोचतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

मुंबई इंडियन्सच्या संघाला आता विजयाचा मार्ग सापडला आहे. त्यामुळे त्यांची गाडी आता रुळावर आली आहे. त्यामुळे आता यापुढील सामन्यांत मुंबई इंडियन्सचा संघ हा सातत्याने विजय मिळवतो का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ आता यापुढे कशी कामगिरी करतो आणि हार्दिक संघाला किती उंचीवर पोहोचवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-08T09:59:24Z dg43tfdfdgfd