पुण्याच्या पठ्याने विष्णू वर्धनच्या साथीने जिंकले आयटीएफ टेनिस स्पर्धेतील विजेतेपद

दिगंबर शिंगोटे : पुण्याच्या सिद्धान्त बांठिया याने विष्णू वर्धनच्या साथीत आयटीएफ टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत सिद्धान्त-विष्णू या तिसऱ्या मानांकितांनी परिक्षित सोमाणी-मनीष सुरेशकुमार या अव्वल मानांकितांवर ६-४, ६-१ अशी मात केली.

पहिल्या सेटमध्ये सिद्धान्त-विष्णू यांनी चांगली सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला २-० अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या गेममध्ये परिक्षित-मनीष सुरेशकुमार यांनी बाजी मारली. त्यानंतर सलग दोन गेम जिंकून सिद्धान्त-विष्णू यांनी ४-१ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर झुंज देऊन परिक्षित-मनीष सुरेशकुमार यांनी सलग दोन गेम जिंकल्या. अर्थात, पिछाडी कमी केली. त्यानंतर आपापल्या सर्व्हिस राखल्यामुळे सिद्धान्त-विष्णू यांच्याकडे नवव्या गेमअखेर ५-४ अशी आघाडी होती. अर्थात, आव्हान राखण्यासाठी परिक्षित-मनीष सुरेशकुमार यांना दहावी गेम जिंकणे गरजेचे होते. मात्र, या गेमसह सेटमध्ये सिद्धान्त-विष्णू यांनी बाजी मारली.

आव्हान राखण्यासाठी परिक्षित-मनीष सुरेशकुमार यांना दुसरा सेट जिंकणे गरजेचे होते. मात्र, सिद्धान्त-विष्णू यांनी धडाक्यात सुरुवात केली. त्याने ४-० अशी आघाडी घेतली होती. पाचव्या गेममध्ये परिक्षित-मनीष सुरेशकुमार यांनी बाजी मारली. मात्र, त्यानंतर सलग दोन गेम जिंकून सिद्धान्त-विष्णू यांनी जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ही लढत तासभर चालली. सिद्धान्तने पुरुषांच्या आयटीएफ स्पर्धेतील दुहेरीचे एकूण आठवे जेतेपद पटकावले.

सिद्धान्त बांठियाचे हे आयटीएफ स्पर्धेतील दुहेरीचे या वर्षातील पहिलेच जेतेपद ठरले. सिद्धान्त बांठियाने विष्णू वर्धनच्या साथीत दुसरे आयटीएफ जेतेपद पटकावले. गेल्या वर्षी विष्णू वर्धनच्या साथीत सिद्धान्तने दावणगेरे आयटीएफ स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. सिद्धान्तने पुरुषांच्या आयटीएफ स्पर्धेतील दुहेरीचे एकूण आठवे जेतेपद पटकावले.

2024-03-18T13:55:40Z dg43tfdfdgfd