फक्त एकच गोष्ट केली तर चेन्नईचा विजय पक्का, ऋतुराज असं नेमकं का म्हणाला जाणून घ्या...

चेन्नई : गेल्या दोन सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे कर्णधार ऋतुराज गायकवाडने सोमवारच्या सामन्यासाठी संघात तीन मोठे बदल केले. पण हा सामान जिंकण्यासाठी फक्त एकच गोष्ट आम्हाला करावी लागेल, असे ऋतुराजने सांगितले.

ऋतुराज म्हणाला की, " गेल्या दोन सामन्यांत आम्हाला पराभव पत्करावा लागला. आम्ही काही धावांच्या फरकाने हरलो, पण त्यामुळे आमचा आत्मविश्वास कमी झाला नाही. त्यामुळे या सोमवारच्या सामन्यात आम्ही काही बदल संघात केले आहेत. केकेआर आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये चांगले क्रिकेट खेळत आहे. पण त्यांना आम्ही पराभूत करू शकतो. हा विश्वास आमच्या संघात नक्कीच आहे. त्यामुळे आम्ही काही गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले आहे. आम्ही जर एकच गोष्ट केली तर आम्हाला विजय मिळवता येऊ शकतो. ही एकमेव गोष्ट म्हणजे, साध्या गोष्टी योग्यपणे करायला हवी. त्यामुळे या सामन्यात आम्ही काही मोठी गोष्ट करणार नाही, पण काही साध्या गोष्टी आहेत त्यावर आम्ही जास्त भर देऊ आणि त्या योग्यपणे कशा करता येऊ शकतील, याकडे लक्ष देऊ."

ऋतुराजच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने या आयपीएलची झोकात सुरुवात केली होती. चेन्नईच्या संघाने सलग तीन सामने जिंकले होते. त्यामुळे चेन्नईचा संघ हा गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान झाला होता. पण त्यानंतरच्या दोन्ही सामन्यांत चेन्नईला पराभव पत्करावे लागले. त्यामुळे चेन्नईच्या संघाला गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखता आले नाही. त्यामुळे हा सहावा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा असेल. कारण जर या सामन्यात चेन्नईच्या संघाने विजय मिळवला तर त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाण्याची संधी असेल.

या सामन्यासाठी ऋतराजने चेन्नईच्या संघात तीन बदल केले. या सामन्यासाठी शार्दुल ठाकूर आणि मिस्ताफिझूर रेहमान यांना संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर समीर रिझवीदेखील या सामन्यात खेळताना दिसणार आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चेन्नईचा संघ हा सामना जिंकून गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थान पटकावणार का, हे सर्वात महत्वाचे असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-08T14:29:40Z dg43tfdfdgfd