फक्त सहा धावा केल्यावर धोनीच्या नावावर होणार मोठा रेकॉर्ड, चेन्नईच्या चाहत्यांना वाटेल अभिमान

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी आता एका मोठ्या विक्रमांच्या उंबरठ्यावर आहे. धोनीने फक्त सहा धावा केल्या की, त्याच्या नावावर एक मोठा विक्रम होणार आहे. त्यामुळे एका मोठ्या विक्रमाशी तो फक्त एकच षटकार दूर आहे.

धोनीने आपल्या फलंदाजीची झलक दिल्लीच्या सामन्यात दाखवून दिली होती. त्यामुळे जुना धोनी पुन्हा एकदा पाहायला मिळाला होता. धोनीने एकाच षटकात दोन षटाकर आणि दोन चौकार लगावत २० धावांची वसूली केली होती. त्यामुळे धोनीने या सामन्यात चाहत्यांची मनं जिंकली होती. पण आता आजच्या सामन्यात धोनीने फक्त सहा धावा केल्या तर त्याचा नावावर एक मोठा विक्रम जमा होणार आहे.

धोनी हा २००८ पासून चेन्नईचा कर्णधार होता. फक्त दोन मोसम तो चेन्नईचा कर्णधार नसल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर दोन वर्षे चेन्नईच्या संघावर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळीही धोनी चेन्नईचा भाग नव्हता. पण आतापर्यंत चेन्नईच्या संघासाठी तो सर्वाधिक सामने खेळला आहे. चेन्नईकडून खेळत असताना धोनीने आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. या हंगामात तर आता धोनीच्या नावावर एक मोठा विक्रम होणार आहे. धोनीने चेन्नईकडून खेळताना सर्वाधिक २४७ सामने खेळला आहे, त्यामध्ये २१५ डावांत त्याने फलंदाजी केली आहे. या २१५ डावांत धोनीने आतापर्यंत ४४९६ धावा केल्या आहेत. त्यामुळे धोनीने जर या सामन्यात फक्त सहा धावा केल्या तर त्याच्या नावावर पाच हजार धावा पूर्ण होणार आहे. त्यामुळे धोनीच्या नााववर हा एक मोठा विक्रम होणार आहे. त्यामुळे धोनी या सामन्यात किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

धोनीने आतापर्यंत चेन्नईच्या संघासाठी बरेच काही केले आहे. धोनीचा हा आता अखेरचा हंगाम असेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे धोनी आपल्या या अखेरच्या आयपीएलच्या हंगामात कोणते विक्रम आपल्या नावावर करतो, याकडे तमाम क्रिकेट विश्वाचे नक्कीच लक्ष लागलेले असणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-05T12:58:16Z dg43tfdfdgfd