बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर; जुरेल आणि सरफराजचे यादीत नाव नाही, बोर्डाने सांगितलं कारण

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी २०२३-२४ साठी वार्षिक खेळाडू रिटेनरशिप कराराची घोषणा केली. त्यात काही उल्लेखनीय बदल केले आहेत. श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना खेळाडू रिटेनरशिप यादीतून काढून टाकणे हा कराराच्या घोषणेचा सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा बनला आहे. पूर्वीच्या करारानुसार इशान किशन सी ग्रेडमध्ये होता. तर अय्यर बी ग्रेडमध्ये होता. दोघांनाही आता करारातून काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान भारतीय संघाचा स्टार लेगस्पिनर युझवेंद्र चहललाही बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून बाद करण्यात आले आहे. चहलही बऱ्याच काळापासून भारतीय संघापासून दूर आहे.

भारतीय बोर्डाने ४० खेळाडूंना करार दिले आहेत. जे आधीच्या खेळाडू रिटेनरशिपच्या तुलनेत वाढले आहेत. २०२२-२३ मध्ये २६ खेळाडूंना करार दिले होते. मात्र यात सरफराज खान आणि ध्रुव जुरेलने नुकतेच भारतासाठी प्रभावी पदार्पण केले आहे. त्यांना चारही श्रेणींमध्ये निवडले गेले नाही. या मागचं एक अतिशय मनोरंजक कारण समोर आलं आहे.

सरफराज आणि जुरेलला करारबद्ध न करण्याचं कारणयाबाबत बीसीसीआयने सांगितले की, जे खेळाडू एका विशिष्ट वेळेत किमान तीन कसोटी, आठ एकदिवसीय किंवा दहा टी-२० सामने खेळण्याचे निकष पूर्ण करतात त्यांना प्रो-रेटा आधारावर ग्रेड सीमध्ये आपोआप समाविष्ट केले जाईल. मात्र सरफराज आणि जुरेल या नियमात बसत नसल्याने त्यांना करारबद्ध करता आले नाही.

याशिवाय, विशिष्ट कालावधीत किमान ३ कसोटी किंवा ८ एकदिवसीय किंवा १० टी-२० खेळण्याचे निकष पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना प्रो-रॅटा आधारावर श्रेणी सी मध्ये आपोआप समाविष्ट केले जाईल. उदाहरणार्थ, ध्रुव जुरेल आणि सरफराज खान, खेळलेले धर्मशाला कसोटी सामन्यात, म्हणजे इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या मालिकेतील ५व्या कसोटी सामन्यात सहभागी झाल्यास आतापर्यंत २ कसोटी सामने ग्रेड सी मध्ये समाविष्ट केले जातील,” असं बीसीसीआयने रिटेनरशिप करारांची घोषणा करताना एका निवेदनात लिहिले आहे.

रजत पाटीदार इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या कसोटी मालिकेत भारतासाठी तीन कसोटी सामने खेळल्यामुळे कराराच्या यादीत स्थान मिळवू शकला आहे. भारतीय बोर्डाने रिंकू सिंग, टिळक वर्मा, रुतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, आवेश खान, प्रसीद कृष्णा, रजत पाटीदार आणि मुकेश कुमार यांना वरील निकषांमध्ये बसणारे ग्रेड सी मध्ये निवडले आहे.

2024-02-28T15:20:16Z dg43tfdfdgfd