भारतीय संघासाठी आली अजून एक गुड न्यूज, रोहितसेना ठरली जगात भारी, पाहा नेमकं काय घडलं...

नवी दिल्ली : भारतीय संघाने गेल्या काही दिवसांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली. भारतीय संघ पिछाडीवर असूनही इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकला. त्यानंतर भारतीय संघ विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत अव्वल स्थानावर पोहोचला होता. पण आता भारतीय संघासाठी अजून एक गुड न्यूज आली आहे.

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमवला गोता. त्यानंतर विशापट्टणमला त्यांनी दुसरा कसोटी सामना जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. त्यानंतर राजकोट येथील सामनाही भारताने जिंकला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारताचा चौथा कसोटी सामना हा रांची येथे खेळवला गेला. या सामन्यात भारताने दमदार विजय साकारला आणि त्यामुळे त्यांनी ३-१ अशी आघाडी घेतली होती. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना हा धरमशाला येथे झाला. हा सामना भारताने सहजपणे जिंकला आणि मालिका ४-१ अशी खिशात टाकली. त्यानंतर आता भारतीय संघाला आता एक गुड न्यूज मिळाली आहे.

भारतासाठी ही कसोटी मालिका बरंच काही देऊन जाणारी ठरली आहे. कारण याा विजयानंतर भारतीय संघाला अजून एक आनंदाची बातमी मिळाली आहे. कारण भारताचा संघ हा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. यापूर्वी भारताने वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये हा मान पटकावला होता. त्यानंतर आता कसोटी क्रमवारीतही भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. त्यामुळे आता कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ जगात सरस ठरला आहे. त्यामुळे आता क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारतीय संघ आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

या मालिकेपूर्वी भारताचा संघ हा विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होता. त्यानंतर भारतीय संघ हा आता पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्यामुळे आता या पुढच्या कसोटी मालिका भारतासाठी महत्वाच्या असणार आहे. कारण भारताने सातत्यपूर्ण विजय मिळवले तर त्यांना या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचता येऊ शकते.

2024-03-12T11:09:38Z dg43tfdfdgfd