माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन, यकृताशी संबंधित आजारावर सुरु होता उपचार

Former Cricket Rohit Sharma Passed Away : क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं (Rohit Sharma) वयाच्या 40 व्या वर्षी निधन झालंय. यकृताशी संबंधीत आजारामुळे तो गेल्या अनेक दिवसांपासून उपचार घेत होता. काही दिवसांपूर्वी त्याला हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान रोहित शर्माची प्राणज्योति मालवली आहे. रोहित शर्मा हा राजस्थान रणजी क्रिकेट संघातील (Rajasthan Ranji Trophy) माजी क्रिकेटपटू (Former Player) होता. (Former cricketer Rohit Sharma passed away rajasthan ranji trophy was undergoing treatment for a liver related disease)

राजस्थानमधून खेळणारा माजी खेळाडू रोहित शर्मा हा एक आक्रमक फलंदाज आणि लेग स्पिन गोलंदाजही होता. मीडिया रिपोर्टनुसार, मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानचा माजी सलामीवीर रोहित शर्माचं शनिवारी जयपूरमधील हॉस्पिटलमध्ये निधन झालं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्माला यकृताशी संबंधित आजार होता.चार-पाच दिवसांपूर्वी त्याला शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. रोहितच्या निधनामुळे राजस्थान क्रिकेट विश्वात शोककळा वातावरण आहे. रोहित शर्माने अनेक रणजी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी दाखवली आहे. 

2024-03-03T08:13:12Z dg43tfdfdgfd