मुंबई इंडियन्स तीन पराभवानंतर ॲक्शन मोडमध्ये; हार्दिक पंड्याला मिळाला अल्टिमेटम

मुंबई : हार्दिक पंड्या हा सध्याच्या घडीला सर्वात जास्त ट्रोल होत आहे. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्विकारल्यापासून हार्दिकला सर्व ठिकाणी चिडवले जात आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाचीही बदनामी होत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा संघ ॲक्शन मोडमध्ये आला आहे आणि त्यांनी हार्दिक पंड्याला अल्टीमेटम दिल्याचे समोर आले आहे.

मुंबई इंडियन्सची यंदाच्या आयपीएलची सुरुवात वाईट झाली. कारण मुंबईच्या संघाला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तर मुंबई इंडियन्सचे नाक कापले गेले. कारण हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा या मुंबई इंडियन्सच्या संघाविरुद्ध केल्या होत्या. या सामन्यातही मुंबईला पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या सामन्यात तर मुंबईच्या संघाती लाज गेली. कारण त्यांचा लाजीरवाणा पराभव झाला. या तीन पराभवानंतर आता मुंबई इंडियन्सच्या संघाने हार्दिक पंड्याला अल्टीमेटम दिल्याचे समोर आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सच्या संघाने तीन पराभवानंतर आता एक मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. कारण सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स हा या आयपीएलमधील एकच संघ आहे, जो एकही सामान जिंकू शकलेला नाही. मुंबईचा संघ हा गुणतालिकेत १० व्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाने आता कडक पाऊल उचलायचे ठरवले आहे. मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याला अजून दोन सामने कर्णधारपद निभावण्याची मुभा देणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी हार्दिक हा पाच सामने तरी कर्णधार असेल. त्यामुळे आता जर आगामी दोन सामन्यांत हार्दिकला संघाला विजय मिळवून देता आला नाही, तर त्याला कर्णधारपदावरून काढले जाऊ शकते. त्यामुळे आता येत्या दोन सामन्यांत मुंबई इंडियन्सचा संघ सामना जिंकतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागेलेले असणार आहे.

या पुढील दोन्ही सामन्यांत मुंबईचा संघ पराभूत झाला तर हार्दिक पंड्याला कर्णधारपदावरून काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर हार्दिकला कर्णधारपदावरून काढले तर कोणाकडे संघाचे नेतृत्व सोपवले जाणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आता मुंबईचा संघ पुन्हा रोहित शर्माकडे कर्णधारपदासाठी जाणार का, याची उत्सुकता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना नक्कीच असणार आहे.

मुंबईने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे आता चौथ्या आणि पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे काय होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-05T10:42:59Z dg43tfdfdgfd