मुंबई इंडियन्स संघात सर्वकाही आलबेल? रोहित शर्माच्या 'या' कृत्यामुळे रंगली चर्चा

IPL 2024 Hardik Pandya Rohit Sharma : येत्या 22 तारखेपासून आयपीलएलला सुरुवात होणार आहे. शुक्रवारपासून आयपीएलच्या 17 व्या सिझनचा महासंग्राम सुरु होणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये सर्व चाहत्यांचं लक्ष मुंबई इंडियन्सच्या टीमवर असणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वीच आयपीएलच्या टीममध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. यामध्ये फ्रेंचायझीने रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला कर्णधारपद देण्यात आलं. दरम्यान यानंतर आता रोहित मुंबई इंडियन्सच्या कॅप्ममध्ये परतला आहेत. अशातच आता रोहितच्या एका कृत्याने चर्चांना उधाण आलं आहे. 

मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सध्या काहीही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. बुधवारी सराव सत्रादरम्यान टीमने मीडिया आणि प्रेक्षकांशिवाय सराव केला. मुंबई इंडियन्सचा सामना 24 मार्च रोजी अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सशी रंगणार आहे. अहमदाबादला जाण्यापूर्वी टीम बुधवारी मुंबईत सराव सामना खेळला. मुख्य म्हणजे रोहित शर्माने सराव सामन्यात भाग घेतला नव्हता. 

सामन्यापूर्वी टीमला मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी सराव सामन्याचे उद्दिष्टं आणि सिझनमधील साध्य करायच्या गोष्टींवर यावर चर्चा केली. सोमवारी टीमच्या शिबिरात सामील झालेला माजी कर्णधार रोहित शर्मा सराव सामन्यात सहभागी झाला नाही. रोहित शर्मा गेल्या तीन दिवसांपासून नेट सराव, स्ट्रेंथ ट्रेनिंग यावर काम करत आहे. त्यामुळे सीझन सुरू होण्यापूर्वी तो सरावासाठी मुंबईतच राहणार आहे.

हार्दिक-रोहितमध्ये सर्व आलबेल?

बुधवारी प्रॅक्टिस सेशन दरम्यान रोहित शर्माने टीमचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याला मिठी मारली. यावेळी दोघांमध्ये कोणतीही जिव्हाळा दिसून न आल्याचा दावा करण्यात आला. यावरून मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये काहीतरी बरोबर नाही हे स्पष्टपणे समजू शकते. यावेळी हार्दिकला हात मिळावयचा होता, मात्र रोहितने गळाभेट घेतली. 

IPL 2024 वेळापत्रक

  • २२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  • २३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
  • २३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
  • २४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनऊ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
  • २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  • २५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  • २६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  • २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
  • २८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
  • २९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  • ३० मार्च - लखनऊ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
  • ३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
  • ३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  • १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
  • २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखनऊ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  • ३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  • ४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  • ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
  • ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
  • ७ एप्रिल - लखनऊ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनऊ

2024-03-21T10:11:02Z dg43tfdfdgfd