मुंबई इंडियन्सच्या सामन्यानंतर ऋषभ पंतवर येऊ शकते बंदी, पाहा संपूर्ण प्रकरण आहे तरी काय...

मुंबई : ऋषभ पंतवर आता मुंबई इंडियन्सच्या सामन्यानंतर बंदी येऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वी बीसीसीआयने दोन वेळा त्याला वॉर्निंग दिली होती. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या सामन्यानंतर तर पंतवर बंदी येऊ शकते, असे आता म्हटले जात आहे.

पंत सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात आहे. कारण गेल्या दोन्ही सामन्यांत त्याने अर्धशतकं झळकावली आहेत. चेन्नईसारख्या बलाढ्य संघाला दिल्लीने पराभूत केले आहे. पण त्यानंतर केकेआरच्या सामन्यात मात्र दिल्लीला पराभव पत्करावा लागला. आता मुंबई इंडियन्सशी दोन हात करण्यासाठी दिल्लीचा संघ सज्ज होत आहे. पण या सामन्यात ऋषभ पंतवर टांगती तलवार असेल. कारण या सामन्यानंतर पंतवर बंदी येण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

दिल्लीला बुधवारी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध हार पत्करावी लागली. या सामन्यात दिल्लीने निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकले होते. त्याबद्दल पंतला २४ लाखांचा दंड करण्यात आला. त्याचवेळी संघातील अन्य सदस्यांना सामना मानधनाच्या २५ टक्के दंडास सामोरे जावे लागले. दिल्ली संघाकडून दुसऱ्यांदा षटकांची गती राखली गेली नाही. त्यामुळे त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. आयपीएलच्या नियमानुसार एकाच मोसमात षटकांची गती तिसऱ्याही सामन्यात राखली गेली नाही, तर कर्णधारास ३० लाख रुपये दंड होतो, तसेच त्याच्यावर एका सामन्याची बंदी येते. त्याचबरोबर संघातील उर्वरित खेळाडूंना १२ लाख किंवा मानधनाच्या ५० टक्के यापैकी कमी असलेल्या रकमेची शिक्षा करण्यात येते. त्यामुळे दिल्ली संघाला आगामी सामन्याच्या वेळी जास्त खबरदारी घेणे भाग पडणार आहे. दिल्लीचा आता पुढचा सामना मुंबई इंडियन्सबरोबर होणार आहे. या सामन्यात जर पुन्हा पंतकडून चूक झाली तर त्याला त्यानंतरच्या सामन्यात खेळता येणार नाही. त्यामुळे मुंबईच्या सामन्यात जर पंतला षटकांची गती वेळेत राखता आली नाही तर त्यापुढील सामन्यात पंतवर बंदी येऊ शकते. त्यामुळे मुंबईचा सामना हा दिल्ली आणि पंत या दोघांसाठी महत्वाचा असेल.

मुंबईच्या सामन्यात पंतकडून जर ही चूक घडली तर पुढच्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. त्यामुळे या सामन्यात नेमकं काय घडतं, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे या सामन्यात मुंबईचा संघ विजयी ठरतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-05T11:28:03Z dg43tfdfdgfd