मुंबई इंडियन्समध्ये उभी फुट; बेजबाबदार हार्दिकची चमचेगिरी करणारे कोण? रोहित सोबत आहेत खेळाडू प्लस कोचिंग स्टाफ

हैदराबाद: आयपीएलचे ५ वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासाठी बुधवारची मॅच एका वाईट स्वप्नासारखी ठरली. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात बेदम धुलाई मुंबईच्या गोलंदाजांची झाली आणि सनरायझर्स हैदराबादने २७७ धावांची विक्रमी धावसंख्या उभी केली. आयपीएल २०२४च्या पहिल्या लढतीत मुंबई संघात सर्व काही बरे नाही अशी शंका वाटली होती आणि ती शंका नसून खरच असल्याचे हैदराबादमधील मॅचनंतर समोर आले.

आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्याआधी मुंबईने चॅम्पियन कर्णधार रोहित शर्माला हटवले आणि हार्दिक पंड्याची नियुक्ती केली. आता लढती सुरू झाल्यानंतर हार्दिकच्या येण्याने संघात पहिल्या सारखे वातावरण राहिलेले दिसत नाही. मुंबई इंडियन्सच्या संघात दोन गट पडले आहेत. हार्दिकचे नेतृत्व बेजबाबदार आणि त्यात गांभिर्य नसल्याचे दिसते. त्याचा गेम प्लॅन अपयशी ठरताना दिसतोय. मुंबईचा सलग दोन सामन्यात पराभव झालाय. संघातील सिनिअर खेळाडू आणि हार्दिक पंड्या यांचे पटत नसल्याचे दिसतेय. विशेषत:रोहित शर्मा आणि त्याचे संबंध बिलकुल ठीक दिसत नाहीत.

ज्या पद्धतीने मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवले आणि हार्दिकला कर्णधार केले त्यावरून दोन्ही खेळाडूंमधील संबंध बिघडल्याचे दिसते. जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मासह अन्य काही खेळाडू रोहित शर्माच्या गटात आहेत. तर ईशान किशनसह संघ मालकांचा हार्दिक पंड्याला पाठिंबा आहे. फक्त खेळाडूच नाही तर कोचिंग स्टाफमध्ये गट पडले आहेत. कायरन पोलार्ड आणि हार्दिकचे संबंध किती चांगले आहेत हे सर्वांना दिसत आहेत. तर गोलंदाजीचा प्रशिक्षक लसिथ मलिंगाला खुर्चीवरून उठवून स्वत: हार्दिक तेथे बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हार्दिक पंड्याच्या खेळातून स्पष्टपणे दिसत आहे की, त्याला या कोणत्याही गोष्टीची पडलेली नाही. कारण अंबानी कुटुंबियांनी त्याला पाठिंबा दिलाय. त्याच्या मैदानावरील वर्तनातून हा बेजबाबदारपणा दिसून येतोय. उदाहरण सांगायचे झाले तर, जसप्रीत बुमराह संघात असताना स्वत:पहिली ओव्हर टाकने. दुसऱ्या सामन्यात १७ वर्षीय अनुभव नसलेल्या मफाकाला संधी देण. हार्दिकच्या या सर्व निर्णयाचा फटका संघाला बसतोय. २ जूनपासून टी-२० वर्ल्डकप सुरू होत आहे आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. असे असून देखील हार्दिक ज्या पद्धतीने रोहितशी वागतोय ते चाहत्यांना देखील न आवडणारे आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-28T09:48:48Z dg43tfdfdgfd