राजस्थानच्या थरारक विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये काय झाला बदल, जाणून घ्या...

कोलकाता : केकेआर आणि राजस्थान यांच्यातील सामना अखेरच्या षटकापर्यंत चांगलाच रंगला. अखेरच्या चेंडूवर राजस्थानच्या बटलरने धाव काढली आणि संघाला विजय मिळवून दिला. या थरारक विजयानंतर आयपीएलच्या पॉइंट्स टेबलमध्येही बदल झाल्याचे पाहायला मिळाले.

यापूर्वी राजस्थानच्या संघाने सहा सामने खेळले होते. या सहा सामन्यांमध्ये राजस्थानने पाच विजय मिळवले होते. पण त्यांना एका सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. राजस्थानच्या संघाने पाच विजय मिळवले होते आणि त्यामुळे त्यांचे १० गुण झाले होते. दुसरीकडे केकेआरच्या संघाने यापूर्वी पाच सामने खेळले होते. या पाच सामन्यांमध्ये त्यांनी चार विजय मिळवले होते आणि एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. केकेआरचा संघ यावेळी चार विजयांसह आठ गुण मिळवून पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ जिंकतो आणि कोणता संघ अव्वल स्थानावर विराजमान होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता सर्वांना होती. राजस्थानने या सामन्यात दोन विकेट्सने विजय साकारला. या विजयानंतर राजस्थानचे दोन गुण वाढले आहेत. या दोन गुणांसह राजस्थानच्या संघाचे आता १२ गुण झाले आहेत आणि त्यामुळे राजस्थानने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

या सामन्यात केकेआरकडून सुनील नरिन आणि राजस्थानकडून जोस बटलर यांनी चांगलेच रंग भरले. नरिनचे हे आयपीएलमधील पहिलेच शतक ठरले. नरिनने याेळी १०९ धावांची झंझावाती खेळी साकारली. राजस्थानकडून जोस बटलरने चांगली झुंज दिली. बटलरने यावेळी आपले अर्धशतकही चौकारासह पूर्ण केले. त्यामुळे हा सामना कोण जिंकेल, याची उत्सुकता ताणली गेली होती. पण त्यानंतर बटलरने शतक झळकावले आणि राजस्थानच्या संघाला दमदार विजय मिळवून दिला.

केकेआर आणि राजस्थान यांनी या लढतीपूर्वी फक्त एकच सामने गमावले होते. त्यामुळे यावेळी कोणत्या संघाचा पराभव होतो आणि कोणता संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर जातो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले होते.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-16T18:38:08Z dg43tfdfdgfd