रोमांचक सामन्यात पंजाबचा गुजरातवर विजय, शशांक-आशुतोषची उल्लेखनीय खेळी

आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जमध्ये संघर्ष झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाबच्या संघाने गुजरातचा ३ विकेटने पराभव केला आहे. किंग्जचा कर्णधार शिखर धवनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.पंजाब किंग्जच्या वतीने मधल्या फळीतील फलंदाज शशांक सिंगने २९ चेंडूत ६१ धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला. यासोबतच आशुतोष शर्मानेही १७ चेंडूत ३१ धावांची तुफानी खेळी करत पंजाबच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

यापूर्वी गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने ४८ चेंडूत ८९ धावांची शानदार खेळी केली आहे. अशा परिस्थितीत आता गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जसमोर २० षटकांत २०० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाबकडून वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने चार षटकांत ४४ धावांत दोन बळी घेतले, तर हरप्रीत ब्रार आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक बळी मिळाला. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली नाही, पण इम्पॅक्ट सब म्हणून मैदानात उतरलेल्या शशांक आणि आशुतोष शर्माने संघाला सामन्यात परत आणले.

या दोन फलंदाजांच्या जोरावर पंजाबने एक चेंडू बाकी असताना सात विकेट्सवर २०० धावा करून विजयाची नोंद केली. पंजाबने या मोसमातील सर्वात मोठे लक्ष्य यशस्वीपणे गाठले. पंजाब संघाने १ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. आयपीएल १७ मधील पंजाबचा हा दुसरा विजय आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-04T18:05:57Z dg43tfdfdgfd