राशिद खानचा विजयी चौकार, शेवटच्या चेंडूवर गुजरात टायटन्सचा राजस्थान रॉयल्सवर थरारक विजय

गुजरात टायटन्सच्या वतीने रशीद खानने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून राजस्थान रॉयल्सला पराभवाचा धक्का दिला. राजस्थान रॉयल्सचा चालू मोसमातील हा पहिला पराभव ठरला. गुजरात टायटन्सने हा सामना ३ गडी राखून जिंकला. शुबमन गिलशिवाय राहुल तेवतिया आणि राशिद खान यांनी कठीण काळात फलंदाजी करत महत्त्वाचे योगदान दिले आहे.

गुजरातच्या विजयात कर्णधार शुभमन गिलचे महत्त्वाचे योगदान होते. त्याने ४४ चेंडूत ७२ धावा केल्या. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये राहुल तेवतिया आणि राशीद खान यांनी अप्रतिम फटकेबाजी करत गुजरातचा विजय निश्चित केला. तेवतियाने ११ चेंडूत २२ धावांची खेळी केली, तर रशीदने ११ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या.

राजस्थान रॉयल्सकडून रायन पराग आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी चांगली फलंदाजी केली. रियान परागने ५ षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ७६ धावा केल्या. तर संजू सॅमसनने ३८ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. सॅमसनच्या बॅटमधून २ षटकारांसह एकूण ९ चौकार आले. गुजरातच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर राशिद खानने ४ षटकात केवळ १८ धावा देत एक विकेट घेतली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-10T18:49:36Z dg43tfdfdgfd