रोहित शर्मा कधी होऊ शकतो CSK चा कर्णधार, मुंबई इंडियन्यच्या खेळाडूनेच सांगितली खास गोष्ट...

मुंबई : रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून काढण्यात आले. पण रोहितला आयपीएलमधल्या बऱ्याच संघांकडून कर्णधारपदाची ऑफर आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने नाव आघाडीवर होते. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने आतापर्यंत सर्वाधिक ५ वेळा जेतपद पटकावले आहे. पण आता धोनीच्या निवृत्तीचा चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे रोहित चेन्नईचा कर्णधार कधी होऊ शकतो, हे आता मुंबई इंडियन्सच्याच एका खेळाडूने सांगितले आहे.

नेमकं घडलं तरी काय...

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला सर्वाधिक जेतेपदं जिंकवून दिली आहेत. पण तरीही मुंबई इंडियन्सच्या संघाने रोहितची कोणतीही चूक नसताना कर्णधारपदावरून हकालपट्टी केली. मुंबईच्या संघाने हार्दिक पंड्याला आपल्या संघात दाखल केले आणि त्याला संघाचे कर्णधारपद दिले. त्यामुळे मुंबईच्या संघाला चाहत्यांनी जोरदार ट्रोल केले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये आता दोन गट पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रोहित शर्मा आता मुंबईच्या संघाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने नेमकं काय सांगितलं, जाणून घ्या...

" रोहित शर्मा अजूनही पाच वर्षे आयपीएल खेळू शकतो. रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या संघाने कर्णधारपदावरून काढले आहे. पण त्याच्यासाठी आता अन्य संघाचे पर्याय खुले झाले आहेत. रोहित हा चेन्नईच्या कर्णधारपदीही विराजमान होऊ शकतो. चेन्नईच्या संघालाही एक परंपरा आहे. त्यामुळे मला वाटतं की रोहित हा चेन्नईचा कर्णधार होऊ शकतो. महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती स्विकारली की, चेन्नईच्या संघापुढे रोहित हा सर्वोत्तम पर्याय असेल, असे मला वाटते. त्यामुळे धोनीने निवृत्ती पत्करल्यावर रोहित हा चेन्नईचा कर्णधार होऊ शकतो," असे मुंबई इंडियन्सकडून यापूर्वी खेळलेल्या अंबाती रायुडूने सांगितले आहे.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांकडून आयपीएलमध्ये खेळला होता तो अंबाती रायुडू. रोहितच्या नेतृत्वाखाली रायुडू मुंबईच्या संघाकडून खेळला होता. त्यानंतर त्याला चेन्नईच्या संघाने आपल्या ताफ्यात घेतले होते. चेन्नईच्या संघाने जेव्हा २०२३ साली आयपीएलचे जेतेपद जिंकले तेव्हा त्याने निवृत्ती जाहीर केली होती.

2024-03-11T10:36:59Z dg43tfdfdgfd