रोहित शर्माचा इंग्लंडच्या लोकांनीही केला खास सन्मान, बाद झाल्यावर नेमकं काय घडलं पाहा...

भारत व इंग्लंड या संघात सुरु असलेल्या ५ व्या कसोटी सामन्यात एक हाती कामगिरी करून दाखवली आहे. अवघ्या २१८ धावांत इंग्लंडच्या संघाला ऑलआऊट करुन भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला. यावेळी भारताने धमाकेदार फलंदाजी केली व पहिल्या डावातच दोन भारतीयांनी शतक लगावले. रोहित शर्माने आपले १२ वे तर शुभमनने टेस्ट क्रिकेटमधील चौथे शतक पूर्ण केले. लंच ब्रेक पर्यंत भारताची धावसंख्या १ आऊट २६४ रन्स इतकी झाली होती. मात्र नंतरच्या डावाच्या सुरुवातीलाच इंग्लंड संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.लंच ब्रेकनंतर रोहितची विकेटइंग्लंड संघाला मोठ्या प्रतीक्षेनंतर ब्रेक थ्रू मिळाला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा खेळत असतांना बेन स्टोक्सच्या बॉलवर तो बोल्ड झाला. रोहित शर्माची ही खेळी १०३ रन्सवर थांबण्यात इंग्लंडचा संघ यशस्वी ठरला. या खेळीदरम्यान त्याने १४ चौकार व ३ शटकार मारले. रोहितला थांबवणे आवश्यक होते कारण रोहितच्या खेळण्यावरून तो मोठा स्कोर करेल असा अंदाज बांधला जात होता.

रोहितला इंग्रजांचे स्टँडिंग ओवेशनबेन स्टोक्स यांच्या गोलंदाजीवर कर्णधार रोहित शर्मा आऊट झाला. रोहित आऊट झाल्यानंतर इंग्लंड संघाने सुटकेचा श्वास घेतला. पीचवरून रोहित शर्मा पवेलियनच्या दिशेने जात असतांना रोहितच्या फलंदाजीवर प्रभावी झालेल्या इंग्रजांनी त्याला स्टँडिंग ओवेशन दिले. रोहितची खेळी कौतुकास्पद असल्याचे त्यांच्या या कृतीतून कळाले.

पहिल्या डावात इंग्लंडचे केवळ २१८ रन्सइंग्लंडचा संघ भारताविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केवळ २०१८ रन्स करू शकला. भारतीय स्पिनर्सने दमदार कामगिरी करत अतिशय कमी रन्स खर्च करुन इंग्लंडचे आव्हान रोखले. टॉस जिंकून इंग्लंडने फलंदाजी निवडली असली तरी पाहुणा संघ पहिल्या डावात फार काही करू शकला नाही. भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने ५ विकेट्स घेऊन इंग्लंड संघाला पहिल्या डावात चितपट केले. भारतीय संघाने या सामन्यात फॉर्म मिळवला आहे.

2024-03-08T10:13:52Z dg43tfdfdgfd